आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळी पार्टीमध्ये पोहोचलेल्या \'जमाई राजा\' च्या अभिनेत्रीने मीडियासमोरच केले सहअभिनेत्रीला ओठांवर Kiss, व्हायरल होत आहे व्हिडीओ 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सीरियल 'जमाई राजा' फेम अभिनेत्री निया शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती आपल्या को-स्टार रेहना पंडितला मीडियासमोरच ओठांवर kiss करतांना दिसत आहे. झाले असे की, होळीच्या निमित्ताने सर्व सेलेब्ससाठी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तिथे या दोन अभिनेत्रीही पोहोचल्या. येथे त्यांनी मीडियासोबत बोलत असतानाच लिपलॉक केले आणि त्यांची पूर्ण हरकत कॅमेऱ्यात कैद झाली. 

निया, रेहनामुळे झाली होती नाराज...
रेहनाच्या पार्टीमध्ये लेट पोहोचल्यामुळे निया नाराज झाली होती. मीडियाला त्याच्याबद्दल सांगताना निया म्हणाली की, तिची सर्वजण सकाळपासून वाट पाहत होते आणि ती दुपारी आली. निया सांगते की, रेहनाचे सकाळी सकाळी खूप ड्रामे असतात. एवढे सांगून दोघींनी एकमेकींना होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि kiss केले. त्यानंतर त्या दोघीही जोरजोरात हसल्या. मग नियाने सांगितले की, भांडण झाल्यामुळे दोघींनी दोन वर्षे सोबत होळी साजरी केली नव्हती. मीडियाच्या आग्रहास्तव नियाने गाणे म्हण्टले आणि डान्सही केला. 

एशियाची दूसरी सेक्सी वूमन अशी पदवीही मिळाली आहे...  
निया शर्माला एशियाची दुसरी सर्वात सेक्सी वुमन ही पदवीही मिळाली आहे आणि ती आपल्या हॉट अदांसाठी खूप प्रसिद्धही आहे. निया लाइमलाइटमधेही राहणे जाणते. ती सोशल मीडियावरही खूप अक्टीव असते आणि आपले बोल्ड स्टाईलमधले फोटोज शेयर करते. यामुळे ती सतत चर्चेत असते.