Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | no admission in Maratha hostel in Solapur

साेलापुरात मराठा वसतिगृहासाठी विद्यार्थी अनुत्सुक; 20 ऑगस्टपर्यंत एकाही अर्ज नाही

प्रतिनिधी | Update - Aug 23, 2018, 01:54 AM IST

शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या वसतिगृहासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाच ठिकाणांची पाहणी केली.

  • no admission in Maratha hostel in Solapur
    file photo.

    सोलापूर - शासनाच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर मराठा समाजाच्या वसतिगृहासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाच ठिकाणांची पाहणी केली. संबंधित जागा ज्या विभागाकडे आहेत, त्या विभागास जागेचा वापर वसतिगृह वापरासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत प्रस्तावही सादर केला. दुसरीकडे वसतिगृह प्रवेशासाठी सर्वच महाविद्यालयांकडील इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन करण्यात आले.

    मात्र, प्रत्यक्षात २० ऑगस्टपर्यंत एकाही विद्यार्थ्यांनी अद्याप वसतिगृहासाठी अर्ज आला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे आता वसतिगृह प्रवेशासाठी अर्जच न आल्याने करायचे काय? असा प्रश्न प्रशासनासमोर पडला आहे.


    प्रशासनाने मराठा विद्यार्थ्यांसाठी शहरातील रंगभवन येथील शासकीय इमारती, भवानी पेठेतील मनपा शाळेची इमारत, मुलींच्या आयटीआयची इमारत, दूध डेअरी येथील खुली जागा, संभाजी तलावाशेजारील केटरिंग महाविद्यालयाच्या इमारतींची पाहणी केली. ५०० विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत, अशा सूचना शासनाने केल्या होत्या. जागा पाहणीनंतर प्रशासनाकडून २० ऑगस्टपर्यंत तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांकडे वसतिगृह प्रवेशासाठी अर्जाचे आवाहन केले होते. मात्र, २० ऑगस्टपर्यंत एकाही विद्यार्थ्याचा अर्ज आला नाही.

Trending