political / अण्वस्त्र धोरणात बदल नाही, पीएमच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला : पाक 

आपल्याच पंतप्रधानांची भूमिका पाकिस्तानला मान्य नाही, अर्ध्या रात्री केले खंडन 

Sep 04,2019 10:36:00 AM IST

इस्लामाबाद / नवी दिल्ली : काश्मिरातून कलम ३७० हटवल्याने संतापलेले पाकिस्तान सरकार अण्वस्त्राची धमकी देत असतानाच एकमेकात गुरफटले आहे. भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पंतप्रधान इम्रान खान यांच्या भूमिकेत सोमवारी दुपारी बदल दिसून आला. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान कोणत्याही देशावर आधी अण्वस्त्र हल्ला करणार नाही.


खान यांचे विधान माध्यमात फिरत असतानाच आपल्याच पंतप्रधानांची ही भूमिका परराष्ट्र मंत्रालयास पसंत पडली नाही. सुमारे ९ तासांनंतर अर्ध्या रात्री परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधानांचे विधान नाकारले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डाॅ. मोहंमद फैजल यांनी ट्विट करीत सांगितले की, अण्वस्त्रांनी सज्ज दोन्ही देशांमधील युद्धावर पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. शस्त्रसज्ज असलेल्या दोन देशांमध्ये युद्ध व्हायला नको. मात्र, पाकिस्तानच्या अण्वस्त्र धाेरणात कोणताही बदल झालेला नाही.
पीएम इम्रान यांनी सोमवारी सांगितले होते - त्यांचा देश कधीच भारताशी युद्धाची सुरुवात करणार नाही.


आयसीजेमध्येही पाक तोंडघशी, वकील म्हणाले- काश्मीरवर खटला कमकुवत
युद्ध झाल्यास जगाला धोका : इम्रान खान

इम्रान खान यांनी शीख समाजाच्या कार्यक्रमात सांगितले होते की, आम्ही आधी अण्वस्त्राचा वापर करणार नाहीत. भारत-पाक दोन्हींकडे अण्वस्त्र आहेत. युद्ध झाल्यास जगाला धोका आहे. आधी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या धमकीवर म्हटले होते की, पहिल्यांदा वापर नाही हे आमचे धाेरण आहे. भविष्यात काय होईल हे परिस्थितीवर अवलंबून असेल.


पाक सरकारकडे पुरावे नाहीत : वकील
काश्मीर मुद्यावरुन पाकिस्तानची आता आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) फजिती झाली आहे. आयसीजेतील वकिल ख्वार कुरेशी यांनी सांगितले की, इम्रान सरकारकडे काश्मीरात नरसंहाराच्या दाव्याचे एवढा पुरावा नाही की तो टिकेल. कुरेशी म्हणाले की, पुरावे नसल्याने पाकला आयसीजेमध्ये कठीण होईल.


शिखांना इम्रान खान यांनी सांगितले - माझे सरकार भाविकांना संरक्षण देईल
सुविधा शीख भाविकांना ऑन अरायव्हल व्हिसा

इम्रान खान यांनी शिखांच्या कार्यक्रमात सांगितले की, शिखांसाठी करतारपूर 'मदीना' आणि ननकाना साहिब 'मक्का' आहे. त्यांनी आश्वासन दिले की, त्यांचे सरकार भारत आणि इतर देशातून येणाऱ्या शिख भाविकांना बहु प्रवेश व्हिजा आणि 'ऑन अरायव्हल' व्हिला देईल. न्यूज इंटरनॅशनलच्या अहवालानुसार खान यांनी सांगितले की, सरकार यात्रेदरम्यान शिख भाविकांना सुविधा पुरवेल.


उत्तर अमरिंदर म्हणाले - पीडित कुटुंबाने परत यावे
इम्रान खान यांनी करतारपूरला येणाऱ्या भाविकांना संरक्षण देण्याचे सांगितले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानात शीख मुलीचे अपहरण करुन लग्न लावण्यात आले. इम्रान खान यांनी मदत केली नाही. पीडित कुटुंबाला वाटले तर भारतात यावे.


अहवाल पीडितेला शेल्टर होममध्ये पाठवले
पाकिस्तानातील शीख मुलीचे अपहरण आणि जबरदस्तीने धर्म परिवर्तन केल्याची तक्रार कुटुंबियांनी केली होती. पोलिसांनी दावा केला की, ती घरी परतली आहे. या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुलीच्या भावाने या घटनेत कोणालाही अटक झाली नसल्याचे व मुलगी घरी आली नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान मुलीला शेल्टर होममध्ये दाखल करण्यात आले आहे.

X