आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रातील कोणत्याही बंदमध्ये व्यापारी सहभागी होणार नाहीत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचा ठराव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्समधील असे आहेत महत्वाचे ठराव
  • आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती केल्यास व्यापारी काळी निषेधाची पट्टी लावून बंदमध्ये सहभागी होणार

मुंबई - राज्यातील कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नाही असा ठराव महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने केला आहे. सतत होणारे बंद आणि आंदोलनामुळे व्यापारांना आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत व्यापारी संघटनेने हा ठराव मांडला आहे. या ठरावानुसार पुढील काळात कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला व्यापारी पाठिंबा देणार नसल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यभरात व्यापाऱ्यांनी ठराव मोहिमेचा कार्यक्रम हाती घेतला आहे.पुकारण्यात येणार बंद सरकारच्या निर्णयाविरोधात असतो. पण प्रत्येकवेळी सामान्य जनता व व्यापारी आंदोलनाचे बळी ठरतात. या सततच्या बंदमुळे व्यापारांना मोठे नुकसान झाले आहे.  या सततच्या गोष्टींना व्यापारी वर्ग वैतागल्याने त्यांनी हा ठराव मांडल्याची माहिती दिली आहे.

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्समधील महत्वाचे ठराव 

  • महाराष्ट्रामध्ये इथून पुढे व्यापारी बंद पाळणार नाहीत.
  • कोणत्याही राजकीय पक्षाच्या बंदला पाठिंबा देणार नाहीत.
  • राजकीय पक्षांनी आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशी विनंती केल्यास व्यापारी दिवसभर डाव्या दंडावर काळी निषेधाची पट्टी लावून बंदमध्ये सहभागी होणार