आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिझाेराम, अरुणाचलसारख्या राज्यांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त नाेकरदार महिला; लैंगिक छळाचा एकही गुन्हा नोंद नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - देशात ज्या राज्यांमध्ये सर्वात जास्त महिला नाेकरी करतात, तिथे कामाच्या ठिकाणी सर्वात कमी प्रकरणे पाहावयास मिळतात. विशेषत: ईशान्य राज्यांत सर्वात जास्त नाेकरदार महिला आहेत, तिथे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ केल्याची एकही तक्रार नाेंद नाही.


नाेकरीच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ राेखण्यासाठी २०१३ मध्ये तयार कायद्याअंतर्गत सर्वात जास्त गुन्हे बिहारमध्ये नाेंदली गेली. तिथे कायदा तयार झाल्यानंतर २०१४ व २०१५ मध्ये एकही गुन्हा नाेंद झाला नव्हता. मात्र, २०१६ मध्ये ७३ प्रकरणांची नाेंद झाली. देशात ही संख्या सर्वात जास्त आहे. महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी लाेकसभेत नुकतीच ही माहिती दिली. २०१४ मध्ये देशभरात ५७, २०१५ मध्ये ११९ आणि २०१६ मध्ये १४२ गुन्हे या कायद्याअंतर्गत नाेंदले. २०१५ मध्ये एकूण ११९ गुन्हे नाेंद हाेते. यामध्ये सर्वात जास्त ३६ गुन्ह्यांची नाेंद दिल्लीत झाली. असे असले तरी २०१६ मध्ये या तीन राज्यांमध्ये अशा प्रकरणांत घट आली आहे. या वर्षी दिल्लीत ९, तेलंगणमध्ये ८ व महाराष्ट्रात ११ प्रकरणे नाेंद झाली. २०१४ मध्येही दिल्लीत ११ व महाराष्ट्रात १० प्रकरणे समाेर आली हाेती. पूर्वेकडील सर्वात माेठे राज्य पश्चिम बंगालमध्ये २०१६ मध्ये एकही प्रकरण समाेर आले नाही.

बातम्या आणखी आहेत...