आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात मुस्लिमांसाठी कुठल्याही प्रकारचे डिटेन्शन सेंटर बनवले जात नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आमचे सरकार राज्यातील मुस्लिमांवर अन्याय होऊ देणार नाही -सीएम
  • राज्यातील मुस्लिम नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई - महाराष्ट्रात नागरिकत्व सिद्ध करू न शकणाऱ्या मुस्लिमांना ठेवण्यासाठी तात्पुरते शिबीर बनवले जात असल्याची अफवा मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभर विविध ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. त्यातच नवी मुंबईत एक डिटेंशन सेंटर बनवल्याची चर्चा सुरू झाली. त्याच मुद्द्यावर मुस्लिम आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याच भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यात कुठल्याही प्रकारचे डिटेन्शन सेंटर नाहीत. त्यामुळे, मुस्लिमांनी कसल्याही प्रकारची चिंता करण्याचे कारण नाही असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

नवी मुंबईत यासाठी बांधले जातेय डिटेन्शन सेंटर

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणाऱ्या मुस्लिम नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, मुस्लिमांवर राज्यात अन्याय होऊ देणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. उद्धव ठाकरे यांनी समुदायाच्या सर्वच समस्या ऐकून घेतल्या. तसेच नवी मुंबईत होत असलेले तात्पुरते शिबीर मुस्लिमांसाठी नाही असे स्पष्ट केले. खारघर येथे तयार केले जाणारे डिटेन्शन सेंटर हे अमली पदार्थ तस्करी आणि इतर आरोपांमध्ये पकडले गेलेल्या परदेशी नागरिकांना ठेवण्यासाठी आहे. या ठिकाणी केवळ 38 जणांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तुरुंगातून सुटलेल्या परदेशी नागरिकांना जोपर्यंत त्यांच्या मायदेशी पाठवले जात नाही, तोपर्यंत त्यांना या ठिकाणी ठेवले जाईल.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून राज्यातील मुस्लिमांनी घाबरू नये. त्यांच्या अधिकारावर आमचे सरकार गदा येऊ देणार नाही असेही ठाकरेंनी सांगितले. या बैठकीला महाराष्ट्राचे गृहमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पोलिस महासंचालक सुबोध जैसवाल, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे, शिवसेना आमदार अब्दुल सत्तार आणि काँग्रेस आमदार अमीन पटेल सुद्धा उपस्थित होते.

अशी झाली चर्चेला सुरुवात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीत बोलताना काँग्रेस आणि कथित अर्बन नक्षलवादी देशात अफवा पसरवतात असा आरोप केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, याच लोकांनी मुस्लिमांना ठेवण्यासाठी डिटेन्शन सेंटर बनवले जात असल्याची अफवा सुरू केली. प्रत्यक्षात नागरिकत्व कायदा आणि एनआरसीचा भारतीय मुस्लिमांशी काहीच संबंध नाही. त्यांनी याबाबत चिंताच करू नये. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले होते, की त्यांची सत्ता असताना महाराष्ट्र सरकारने व्हिसाची मुदत संपलेल्या परदेशी नागरिकांना ठेवण्यासाठी तात्पुरती शिबीरे बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता. सिडकोला यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या, की त्यांनी नवी मुंबईत जमीन घेऊन त्यासाठी बांधकाम करावे. अशा तात्पुरत्या शिबीरांना डिटेन्शन सेंटर म्हणणे चुकीचे आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.