आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणुकीत घुमणार नाही DJ चा आवाज, मुंबई हायकोर्टाने फेटाळली \'डीजेवाले बाबू\' ची याचिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हायकोर्टाने डीजे चालकांना दिलासा देण्यास नकार देत डीजे बंदीवरी स्थगितीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यामुळे डीजे चालवण्यास परवानगी देणार नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे डॉल्बी आणि डीजेवर असलेली बंदी कायम राहणार आहे. 


या प्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे. हायकोर्टाने पाला संघटनेच्या वतीने करण्यात आलेली याचिका दाखल करून घेतली. या याचिकेमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी डीजे बंदीला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने दिलासा देण्यास नकार देत, डीजेवरील बॅन कायम ठेवला. 


याचिकाकर्त्यांचे वकील अॅडव्होकेट सतीश तळेकर म्हणाले की, हायकोर्टाने सरकारकडे यासंबंधी म्हणणे मागवले होते. पण सरकारने उत्तर वेळेत आले नाही त्यामुळे हायकोर्टाला योग्य तो निर्णय देता आला नाही, त्यामुळे कोर्टाने चार आठवड्यांनंतर सुनावणीची तारीख दिली. शासनाला या चार आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, या चार आठवड्यांमध्ये कोणत्याही प्रकारे डीजे किंवा डॉल्बी वाजवण्यास बंदी असणार आहे. याचिकार्त्यांना या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागायची असल्यास त्यासंबंधी तातडीने आजच पावले उचलावी लागणार आहेत. 


डीजे सुरू केला तरी आवाजाची मर्यादा ओलांडली जाते
ध्वनिप्रदूषणाबाबत दाखल झालेल्या एकूण याचिकांपैकी किमान ७५ टक्के प्रकरणे डीजे व डॉल्बीशी संबंधित असल्याचे सांगत डीजेवरील बंदी ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा एक भाग असल्याची भूमिकाही सरकारने घेतली आहे. सामान्य आवाजाच्या पातळीवर डीजे किंवा डॉल्बी सिस्टिम सुरू केली तरी ध्वनिप्रदूषणाची मर्यादा किमान शंभर डेसिबल्सपर्यंत जात असून हे प्रमाण ध्वनिप्रदूषण कायद्याने नेमून दिलेल्या मर्यादेच्या जवळपास दुप्पट असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र सरकारच्या या महणण्यामध्ये तथ्य नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...