ताेकडे कपडे घातल्यास / ताेकडे कपडे घातल्यास महालक्ष्मी मंदिरात प्रवेश नाही, नवरात्रीपासून अंमलबजावणी

Oct 01,2018 09:23:00 PM IST

काेल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने काेल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरासह त्यांच्या अखत्यारीतील सर्वच मंदिरांमध्ये ताेकड्या कपड्यांमध्ये असलेल्या महिला, मुलींना तसेच पुरुषांना प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला अाहे. अागामी शारदीय नवरात्राेत्सवापासून म्हणजे १० अाॅक्टाेबरपासून महालक्ष्मी मंदिरात या निर्णयाची अंमलबजावणी हाेणार अाहे.

त्यानंतर टप्प्याटप्प्याने देवस्थान समितीच्या इतर मंदिरांतही हा नियम लागू हाेईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी साेमवारी पत्रकार परिषदेत दिली. अनेक भाविकांनी मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी सूचना केल्या हाेत्या. त्यानुसार महिला, पुरुष यांनी पूर्ण पाेशाखात मंदिरात प्रवेश केल्यास मंदिराची शोभा वाढेल, असेही सांगण्यात अाले हाेते. भाविकांच्या भावनांची दखल घेत हा निर्णय घेण्यात अाल्याचे जाधव म्हणाले.

X