आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No Fake News: Mysterious Animal News On Social Media In A Nursery Of Hanumangarh Is Fake

माणसाप्रमाणे दिसते या भयावह प्राण्याचे तोंड, रात्री घरातून बाहेर पडायलाही घाबरतात लोक, जाणून घ्या यामागचे सत्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमानगड - राजस्थानात सध्या माणसासारखा चेहरा प्राण्यासारखे शरीर आणि मांजरीसारख्या चालणाऱ्या या प्राण्याबाबत चर्चा आहे. या प्राण्याची नखे मोटी आहेत. त्यामुळे या प्राण्यापासून सावध राहा त्यापासून तुम्हाला धोका आहे, असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे सगळीकडे भितीचे वातावरण आहे. सगळेच हा मॅसेज खोटा असल्याचे सांगत होते, पण तरी रात्री घराबाहेर पडायलाही घाबरत होते. त्यामुळे आम्ही याबाबतचे सत्य सर्वांसमोर आणायचे ठरवले. आमच्या प्रतिनिधीने दोन दिवस वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह दोव दिवस शोध घेतला, पण असा प्राणी दिसला नाही. त्यामुळे समाजकंटकांनी ही चर्चा पसरवल्याचे समोर येतेय. 


इंटरनेटही काही मिळाले नाही 
आमच्या प्रतिनिधींनी या मॅसेजचे सत्य पडताळण्यासाठी रात्री 12:30 वाजेपासून थालडका वन विभागाच्या हद्दीत शोधाशोध केली. अगदी कोपरा कोपरा शोधला. पहाटेपर्यंत हा शोध घेणे सुरू होते. पण असा प्राणी मिळाला नाही. नंतर पुन्हा शोधाशोध करण्यात आली. पण असे काहीही आढळले नाही. हा फोटो कॉम्प्युटरच्या मदतीने तयार केला असावा असे समोर आले. घाबरण्याचे कारण नसून अशा खोटा अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी म्हणाले. अशा मॅसेजला न घाबरता त्याबाबत सूचना देण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...