आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयत्व सिद्ध करावं लागतं यापेक्षा मोठी वेदना नाही, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केली खंत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-जेंव्हा भारतातील व्यक्तीला आपले भारतीयत्व सिद्ध करावे लागे. यापेक्षा जीवनातील मोठी वेदना नाही. अशी खंत 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी बुधवारी व्यक्त केली. असे सांगताना त्यांनी ''टिळकांनी लिहिलेला सरकारचे डोके ठिकाणावर आहे का'', हा अग्रलेख परत मुद्रित करता येईल का, असा प्रश्नही उपस्थित केला.

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने बुधवारी डॉ.ना.गो.नांदापुरकर सभागृहात उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष दिब्रिटो यांच्या निवडीबद्दल जाहिर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध कवी ना.धों.महानोर यांच्या हस्ते दिब्रिटो यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मसाप आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील होते. कार्यवाह दादा गोरे, के.एस.अतकरे, प्रा.जयदेव डोळे, डॉ.ऋषिकेश कांबळे यांची उपस्थिती होती. 
फादर फ्रान्सिस दिब्रिटा म्हणाले, "आज धर्म ही एक चिंतेची बाब बनली आहे. खरं तर धर्म हा परिवर्तनाची वाट दाखवणारा असतो. समाजाला संवादाची गरज आहे. संवाद जगण्याचा नवा मंत्र आहे. मौनाचा संवाद करू यात. तो संवाद व्यापक व्हावा. विचारवंतांनी बोलायला हवे. एकत्र यायला हवे. विषारी विचार धोकादायक असतात. भीतीमुक्ती हीच खरी मुक्ती असून ईश्वराची, सैतानाचीही भीती ठेऊ नका. भीतीच्या आवरणाखाली जे असतात ते गुलाम असतात.  आदर्श केवळ पूजेसाठी नसतो तर ता जगण्यासाठी असतो." 


आज जग बहुविविध झाले आहे आणि ही बहुविविधता आपण जगलेलो आहोत. सर्वांना सामावून घेणे हा मूळचा भारतीय विचार आहे, असे सांगताना त्यांनी कामील कुलके या विदेशी व्यक्तीने लिहिलेली रामकथा छापण्यात आल्याचे आणि कोलकत्यात बायबलचे भाषांतर करण्यासाठी संस्कृतचे ज्ञान घेण्यात आल्याची उदाहरण दिले. जे साहित्य अबोध मनात जागा करते तेच साहित्य अमर असते, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे शत्रू, लोकशाहीचे शत्रू असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य राजकीय शक्ती देत नसते. तो तुमच्यापासून कुणही हिरावू शकत नाही. कारण प्रतीगामी शक्तींना विचारांची भिती वाटत असते. असेही दिब्रिटो ते म्हणाले.
सुरुवातीला फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या साहित्यावर प्रा. जयदेव डोळे व प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी भाष्य केले. महानोर यांनी साहित्य महामंडळाने संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रिया बिनविरोध करून नवा पायंडा पाडल्याचे सांगितले. यावेळी फ. मु. शिंदे, सेवानिवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. सुधीर रसाळ, प्राचार्य रा. रं. बोराडे, बाबा भांड, डॉ.छाया महाजन, दासू वैद्य, डॉ.रसिका देशमुख, प्रा.रामचंद्र काळुंखे, श्याम देशपांडे उपस्थिती होती. 

 

बातम्या आणखी आहेत...