Home | Business | Business Special | No Longer pay Thailand Visa-on-arrival Fees From December 1 To January 31

थायलंड फिरायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आहे गुड न्यूज, या कामासाठी एक रुपयाही घेणार नाही तेथील सरकार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 10, 2018, 12:58 PM IST

दोन महिन्यांसाठी आहे ही ऑफर...

 • No Longer pay Thailand Visa-on-arrival Fees From December 1 To January 31


  ट्रॅव्हल डेस्क - थायलंडने भारताससह 21 देशांसोबत करार केला आहे. त्यानुसार, या देशांतून थायलंडला जाण्यासाठी 1 डिसेंबर 2018 ते 31 जानेवारी 2019 या कालावधीत व्हीसा ऑन अरायव्हल फी घेणार नाही. अर्थात साउथ ईस्ट एशियन टूरिस्ट स्पॉटवर जाणे आता आणखी परवडणार आहे. थायलंड सरकारने पर्यटनाला चालणा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

  4400 रुपयांची होईल बचत

  थायलंडच्या व्हीसा ऑन अरायव्हलची सध्याची फी 4400 रुपये आहे. ज्यात तुम्हाला 15 दिवस राहण्याची मुभा मिळते. पण, डिसेंबर आणि जानेवारीत तुम्ही गेलात तर तुमच्या 4400 रुपयांची बचत होईल. परंतु, यासाठी एक अट देखील आहे. ती म्हणजे तुम्ही 14 दिवसांपेक्षा जास्त काळ तेथे राहू शकणार नाही.

  या देशांना मिळेल सूट
  भारत, बुल्गारिया, सायप्रस, मॉरिशस, रोमानिया, सौदी अरेबिया, फिजी, तैवान, उज्बेकिस्तान, युक्रेन, कझाकस्तान, चीन, भूतान, इथोपिया, माल्टा आणि पापुआ न्यू गिनी.

Trending