आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कितीही बिझी शेड्युल असले असले तरी मी स्वत:साठी वेळ काढते, सांगतेय प्रेक्षकांची लाडकी नायरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी "ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत नायराचे पात्र साकारत आहे. तिच्या मते, मालिकांमध्ये काम करायचे म्हटले की भरपूर वेळ द्यावा लागतो, परंतु स्वत:साठी वेळ काढलाच पाहिजे. नुकतीच दिव्य मराठी सोबत झालेल्या बातचीतमध्ये शिवांगीने मालिका आणि तिच्या सहकलाकारांबाबत सांगितले.

  • या मालिकेत काम करताना कधी तणाव असल्याचे जाणवले का?

नाही. मी आपल्या मालिकेसाठी दररोज १०० टक्के आणि आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करते. मी यामध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे, परंतु मला कधीच तणाव जाणवला नाही. मी माझे पात्र ‘नायरा’ साकारताना खूप एंजॉय करते. प्रेक्षकांना आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न दररोज करते.

  • या मालिकेत अनेक कलावंत एकत्र काम करत आहेत. तुम्ही कधी एकमेकांच्या गुणवत्तेचा तिरस्कार केला आहे का?

नाही. असे कधीच झाले नाही. आम्ही सर्वजण टीम म्हणून एकत्रितपणे काम करतो आणि हेच आमच्यासाठी फायद्याचे ठरले आहे. आम्ही सेटवर एकमेकांची मदत करतो. आमची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री जेवढी चांगली तेवढीच ऑन-स्क्रीनही आहे. कलावंतच नाही तर आमच्या मालिकेतील पडद्यामागील कलाकारही खूप गुणवंत आहेत. आम्ही सर्व एका कुटुंबाप्रमाणे काम करतो. मला इतक्या चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते. A post shared by शिवांगी जोशी (@shivangijoshi18) on Sep 17, 2019 at 1:41am PDT

  • मालिकेसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. तू कसे मॅनेज करतेस?

माझा दृढ संकल्प आणि प्रेरणा या गोष्टींवर विश्वास आहे. माझ्यासाठी प्रत्येक दिवस एक नवा दिवस आहे. प्रत्येक दिवस शूटिंगमधून पॅकअप केल्यानंतर काहीतरी शिकूनच मी घरी परतते.

  • इंडस्ट्रीमध्ये मैत्रीला कोणतेच स्थान नसल्याचे बोलले जाते. हे खरे आहे काय?

मी हे मानत नाही. लता सभरवाल आणि अदिती भाटिया माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. आम्ही पॅकअप केल्यानंतर एकमेकींसोबत भरपूर वेळ घालवतो. वेळ मिळताच आम्ही फिरायला निघून जातो किंवा एकमेकींच्या घरी जाऊन खूप धमाल करतो.

  • निर्माते राजन शाहीसोबत काम करण्याचा अनुभव कसा राहिला?

ती सज्जन व्यक्ती आहे. त्यांना आमच्यावर खूप विश्वास आहे. मला या सुंदर मालिकेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे.

  • एक कलावंत असण्याची सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट काय आहे?

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला जे लोक पाहतात त्यांच्याकडून प्रेम मिळते. यामुळे आमचे कष्ट वाया जात नसल्याचा विश्वास मिळतो. वाईट म्हणजे आम्ही कुटुंब आणि मित्रांंना जास्त वेळ देऊ शकत नाही. मात्र, काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते.

  • आमच्याकडे प्रेमासाठी वेळ नसल्याचे अनेक अभिनेते सांगतात. हे खरे आहे?

कोणत्याही प्रोफेशनसाठी वेळ द्यावाच लागतो. तथापि, लोक स्वत:साठी आणि इतरांसाठी किती वेळ काढतात, यावर ते अवलंबून असते. जसे की, मी अजूनही कुटुंबियांना भेटायला जाते. माझे वेळापत्रक कितीही व्यग्र असो, मी दिलेला शब्द नक्की पाळते.

बातम्या आणखी आहेत...