ऑस्ट्रिया / ऑस्ट्रियाच्या फुटबॉल स्टेडियममध्ये आता सामने नाही; मैदानावर लावली ३०० झाडे, लोक तिकीट घेऊन झाडे पाहण्यासाठी येतील

ऑस्ट्रियाच्या या स्टेडियममध्ये आतापर्यंत फुटबॉल होत होते, आता येथे झाडे पाहण्यासाठी ३० हजार लोक येतील

वृत्तसंस्था

Sep 08,2019 08:51:00 AM IST

क्लॅगनफर्ट - “जमिनीवर हिरवळ दुर्लभ होत असून तो दिवस दूर नाही, जेव्हा लोक झाडेे पाहण्यासाठी प्रदर्शनात जातील. कोणत्या विशिष्ट जागी भरपूर झाडे लावण्यात येतील आणि लोक तिकीट घेऊन केवळ झाडे कसे असतात हे पाहण्यासाठी येतील.’ ऑस्ट्रियाच्या ४९ वर्षीय जुन्या वर्दरसी स्टेडियमने या अनोख्या विचारासह व सावध करण्यासाठी पाऊल उचलले. १९६० पासून या मैदानावर होणारे फुटबॉल सामने आता बंद झाले. मैदानावर जवळपास ३०० झाडे लावण्यात आले. आता स्टेडियममध्ये लोक सामने नाही, तर झाडांचे प्रदर्शन पाहण्यासाठी येतील. झाडे पाहण्यासाठी तिकीट लावण्यात येईल. त्यामुळे लोक त्याचे महत्त्व जाणतील. झाडे लावण्याचे काम जवळपास ४ ते ५ महिन्यांपासून सुरू आहे. त्याचे प्रदर्शन पाहण्यासाठी आज म्हणजे रविवारपासून स्टेडियम खुले करण्यात येईल.

१९७० मध्ये पीटनरच्या चित्रामुळे आला विचार
हे पेन्सिल छायाचित्र १९७० मध्ये मॅक्स पीटनरने काढले. हे चित्र व चित्रासोबत दिलेल्या संदेशामुळे वर्दरसी स्टेडियममधील झाडाच्या प्रदर्शनावर व्यवस्थापक क्लॉस यांनी काम केले. एकावेळी ३० हजार लोक स्टँडमध्ये येऊ शकतात. ही झाडे लोकांना हिरवळीसाठी सावध करतील आणि वर्षाला जवळपास ७८ हजार पाउंड ऑक्सिजन देतील.

X
COMMENT