आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारचा आदेश:ड्रायव्हींग लायसन्स, आरसी कार्ड बाळगण्याची गरज नाही, होणार नाही कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सरकारने आता गाडी चालवताना लायसन्सची हार्डकॉपी सोबत बाळगणे गरजेचे नसल्याचा आदेश दिला आहे. जर तुम्ही ड्रायव्हींग लायसन्स आणि गाडीचे आरसीबूक घरी विसरले असाल तर पोलिस त्यासाठी पावती फाडू शकणार नाही. तुम्हाला या दस्तऐवजांची कॉपी डिजिटल लॉकरमध्ये ठेवावी लागेल. ट्राफिक पोलिस चेकिंगदरम्यान डिजिलॉकर अॅपद्वारे त्यांची तपासणी करतील. सरकारने याबाबत परिवहन विभाग आणि ट्राफिक पोलिसांसाठी निर्देश जारी केले आहेत. 


सरकारने काय म्हटले.. 
- परिवहन मंत्रालयाने ट्राफिक पोलिस आणि राज्यांच्या परिवहन विभागांना ड्रायव्हींग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि इंश्युरन्स सारख्या कागदपत्रांची ओरिजनल कॉपी व्होरीफिकेशनच्या वेळी घेऊ नये. आदेशात म्हटले आहे की, डिजिलॉकर किंवा एमपरिवहन अॅपवरील कागदपत्रांची इलेक्ट्रॉनिक कॉपी यासाठी मान्य असतील. 


अॅप डाऊनलोड करावे लागणार 
- यासाठी तुम्हाला स्मार्टफोनमध्ये DigiLocker App डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्ही त्यात सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स सेव्ह करू शकता. 
- येथे डॉक्युमेंट अपलोड करताना DigiLocker मध्ये सर्व महत्त्वाचे डॉक्युमेंट्स उदा. पॅन कार्ड, पासपोर्ट, मार्कशीट, डिग्री स्टोअर करता येईल. जर तुम्हाला कुठे डॉक्युमेंट पाठवायचे असेल तर तुम्हाला त्याची डिजिटल कॉपी थेट शेअर करता येईल. काही दिवस यात 1GB पर्यंत स्टोरेज करता येईल. 
- यूझरला DigiLocker त्यांच्या Google आणि Facebook अकाऊंटशी लिंकही करता येईल. सर्व डॉक्युमेंट्सच्या फाइल pdf, jpg, jpeg, png, bmp आणि gif फॉरमॅटमध्ये अपलोड करता येईल. 

 
असा करा DigiLocker चा वापर 
Step 1

DigiLocker गूगल प्लेस्टोरवरून डाऊनलोड करा. इन्स्टॉल करून नंतर ते ओपन करा. वेलकम स्क्रीनवर दोन पर्याय दिसतील. एक Sign In आणि दुसरे Sing Up चे असेल. जर आधीचे अकाऊंट असेल तर Sign In वर क्लिक करून लॉग इन करा. किंवा प्रथमच वापरत असाल तर Sing up च्या ऑप्शनवर जा. 
Step 2
येथे मोबाईल नंबर टाकावा लागेल. नंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर OTP येईल. त्यामार्फत व्हेरीफिकेशन होईल. त्यानंतर तुम्हाला नाव आणि पासवर्ड क्रिएट करावे लागेल. 
Step 3
DigiLocker अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक त्याच्याशी लिंक करावे लागेल. Tap On LinkAadhar वर क्लिक करा आणि 12 आकडी आधारक्रमांक टाका. OTP मार्फत व्हेरीफिकेशन केले जाईल. आता तुम्ही डॉक्युमेंट्स स्टोर करण्यासाठी DigiLocker वापरू शकता. 

 

बातम्या आणखी आहेत...