आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी आरटीओमध्ये वाहन घेऊन जाण्याची आवश्यकता नाही, ऑनलाईन करू शकता नोंदणी- नितीन गडकरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- प्रवास 2019 या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित करताना भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच जहाज मंत्रालय, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, त्यांनी नुकतंच आंतरराज्यीय प्रवासासाठी राष्ट्रीय परवाना योजनेच्या फाईलवर सही केली आणि या योजनेस भारत सरकारकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच मोटर व्हेईकल अॅक्टमधील किमान शिक्षणाची अटही शिथील करण्यात आली आहे, कारण बहुसंख्य वाहन चालक असे आहेत जे आठवी सुद्धा उत्तीर्ण नाही पण ते अतिशय कुशल असे वाहन चालक आहेत. परंतु किमान शिक्षणाच्या अटीमुळे त्यांच्या वाहन चालक परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही.

 

भारतामध्ये 23 ते 25 लाख वाहन चालकांची कमतरता आहे. तसेच परवान्याची स्थितीही तितकीशी चांगली नाही कारण 30 टक्के परवाने हे बोगस आहेत. एक-एक व्यक्ती चार चार राज्यांमध्ये जाऊन परवाने काढत आहे. हे सर्व टाळण्यासाठी आणि नवीन मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये अनेक चांगल्या सुधारणा केल्या आहेत. सोमवारी हे बिल राज्यसभेमध्ये सादर केले जाईल आणि राज्यसभेमध्येही हे बिल पास होईल असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. 


आम्ही नवीन तंत्रज्ञान, आधुनिकीकरण, नवीन व्यवसाय, नवीन चालना दळणवळण क्षेत्रामध्ये आणत आहोत आणि त्यामुळेच आम्ही राज्य शासनांना मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत, आता इलेक्ट्रिक बसेसवर फक्त 5% जीएसटी आकारण्यात येणार आहे. प्रवासी वाहतुकीसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक कार टॅक्सी, इलेक्ट्रिक रिक्षा आणि इलेक्ट्रिक दुचाकी यांसारख्या कोणत्याही विद्युत वाहनास परमिटची गरज नसेल. 

लवकरच नवीन वाहनाच्या नोंदणीसाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयामध्ये तुमचे वाहन घेऊन जाण्याची आवश्यकता नाही, कारण आता ग्राहक हे काम ऑनलाईन करू शकतील. तुम्ही तुमच्या वाहनांची नोंदणी ऑनलाईन करून परमिट मिळवू शकता. राज्य सरकारच्या आरटीओकडेच नोंदणी अधिकार असतील, पण नोंदणी ऑनलाईन होईल. यामुळे भ्रष्टाचार कमी होईल. राज्य सरकारच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन नोंदणी शुल्क भरण्याची जबाबदारी ही विक्रेत्याची असेल. विक्रेत्याने नोंदणी शुल्क भरल्यानंतर त्यांना राज्य आरटीओकडून नोंदणी क्रमांक मिळेल आणि ग्राहकाच्या वाहनांची निंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...