आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे - दोन दशकांपूर्वी बाजारांतील लाल टपालपेट्या प्रत्येक घरात अथवा कार्यालयात गरजेचे होते. कुरियर सर्व्हिसने याची उणीव भरून काढली. नंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक, टेलिग्राम व मोबाइल फोनच्या जमान्यात तेही मागे पडले. आता २१ व्या शतकात लेटरबॉक्सचा डिजिटल प्रकार रुजत आहे.
या डिजिटल पार्सल लॉकरला पॉडबँक असे नाव देण्यात आले आहे. ऑफिस कॉम्प्लेक्स, हाउसिंग सोसायटी व इमारतीत ते बसवण्यात येत आहे. अातापर्यंत ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला डिलिव्हरी बॉयने दिलेल्या वेळेवर घरी-ऑफिसमध्ये वाट पाहत थांबावे लागत होते. काही वेळा मीटिंगही सोडाव्या लागत असत. आता त्याची गरज भासणार नाही. डिलिव्हरी बॉय तुमच्या घरी अथवा ऑफिसबाहेर असलेल्या पाॅडबँकेत पार्सल ठेवून जाईल. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार, ओटीपी टाकून पार्सल घेऊन जाऊ शकाल. सध्या ही सेवा फक्त पुण्यात सुरू आहे.
या सुविधेमुळे रिअल इस्टेट मॅनेजरला मोठमोठ्या सोसायट्यांत फ्लॅटमालक अथवा भाडेकरूच्या सुरक्षेची काळजी करण्याची गरज पडणार नाही. महानगरातील मोठ्या टाऊनशिपमध्ये शेकडो डिलिव्हरी बॉय जातात. त्यामुळे फ्लॅट अथवा डुप्लेक्स बंगल्यात राहणाऱ्या लोकांची सुरक्षा हा चिंतेचा विषय ठरला आहे. नव्या सुविधेत डिलिव्हरी बॉयला गेटवरच ठेवलेल्या पॉडबँकेत तुमचे पार्सल ठेवून जाता येईल.
ऑनलाइन ऑर्डरचा ट्रेंड वाढतोय
देशात ऑनलाइन ऑर्डर करून वस्तू मागवण्याचा ट्रेंड वाढतो आहे. बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप व गुगलच्या ताज्या अहवालानुसार, मोबाइलद्वारे जेवण मागवण्याची पद्धत २५ ते ३० टक्क्यांनी वाढते आहे. याची उलाढाल २०२२ पर्यंत ५६८०० कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. संपूर्ण ऑनलाइन खर्च येत्या ५ वर्षांत २५% ने वाढून ९ लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.
खासगी बँकांनी बसवले आयबॉक्स
खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने पॉडबँकेवर आधारित सुविधा ‘आयबॉक्स’ लाँच केली अाहे. ग्राहकांना डेबिट, क्रेडिट कार्ड, चेकबुक व रिटर्न चेक यातून मिळू शकतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.