Home | National | Other State | No of tigers increase in last three year in Geer Jungle

तीन वर्षांत गीरमधील वाघांच्या संख्येत वाढ; जंगलातील वाघांची संख्या ६००

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 24, 2019, 11:55 AM IST

वन विभागाने केली माेजणी, २०१५ मध्ये हाेते ५११

  • No of tigers increase in last three year in Geer Jungle
    राजुला - गीरच्या जंगलात भारतीय वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ हाेत अाहे. वन विभागाकडून दर पाच वर्षांनी वाघांची गणना केली जाते. परंतु या वाघांवर देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने विभागाकडून अधूनमधूनही गणना केली जाते. वन विभागाने चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेच्या रात्री वाघांची गणना केली. यामध्ये वाघांची संख्या ६०० च्या वर गेली असल्याचे दिसून आले. परंतु वन विभागाकडून अद्याप याची अधिकृत घाेषणा करण्यात आलेली नाही. २०१५ मध्ये वन विभागाने गीरच्या जंगलात वाघांची गणना केली हाेती, त्या वेळी ५११ वाघांची नाेंद झाली हाेती. त्यानंतर चार वर्षांत वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १९ एप्रिल राेजी वन विभागाने केलेल्या प्राथमिक गणनेत ६०० पेक्षा जास्त वाघांची नाेंद झाली अाहे. गीरशिवाय अमरेली, भावनगर, जुनागढ, गीर - साेमनाथच्या महसुली जिल्ह्यात वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे.

Trending