आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • No One Arrived To Collect The Dead Body Of The Rape Victim, Police Cremated The Funeral

बलात्कार पीडितेचा मृतदेह घेण्यास कोणीही आले नाही, पोलिसांनी हिंदू पद्धतीने केले अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवसांपूर्वी पीडितेचा झाला होता मृत्यू, परंतु मृतदेह नेण्यास कोणीही आले नव्हते
  • पोलिसांनी सांगितले की, यामुळेच आम्ही सर्व विधी पूर्ण करण्याचे ठरवले

आग्रा - उत्तरप्रदेशच्या आग्रा येथे पोलिसांनी शुक्रवारी एका बलात्कार पीडितेच्या मृतदेहाचे हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले. यानंतर पोलिसांनी जेवणाचे आयोजन केले होते. एसपी रोहन बोतरे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी पीडित मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला होता, मात्र तिचा मृतदेह घेण्यासाठी कोणीही आले नाही. यामुळे आम्हीच अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करण्याचे ठरवले. 

यामुळे पोलिस आणि सर्वसामान्यांमध्ये चांगले संबंध होतील - पोलिस

स्थानिक लोकांनी देखील पोलिसांचे कौतुक केले. तसेच याला एक चांगला उपक्रम सांगितला. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या प्रयत्नाने पोलिस आणि सर्वसामान्यांमध्ये चांगले संबंध निर्माण होतील आणि आत्मविश्वास वाढेल.