आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कला जोपासल्याने कोणी पदवीची चौकशी करत नाही, व्यंगचित्रकारिता कार्यशाळेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुण्यात प्रतिपादन

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे - जगात शिक्षणाला डिग्री लागते. कला आत्मसात करण्यासाठी कोणतीही डिग्री लागत नाही. मी राजकीय व्यंगचित्रकार होण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षण सोडून दिले अन् काका बाळासाहेब ठाकरे व वडील श्रीकांत ठाकरे यांच्याकडे व्यंगचित्र रेखाटायला शिकलो. त्यामुळे माझ्याकडे पदवी नसली तरी कला जोपासल्यामुळे माझ्याकडे पदवीविषयी चौकशी करत नाही, अशी प्रांजळ कबुली राज ठाकरे यांनी दिली. जगात कोठेही डिग्रीविना कला जोपासल्याने जाता येते. अशी कला जोपसणाऱ्यांची महती एक प्रख्यात व्यंगचित्रकार या नात्याने राज ठाकरे यांनी सांगितली. ते पुण्यात इंक अलाइव्ह या बालचमूच्या व्यंगचित्र कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.उत्तम कलेला जगामध्ये मरण नाही. प्रत्येकामध्ये कोणती तरी एक कला असते. ती वाढवणे गरजेचे आहे. मुलांनी कला जोपासायला हवी. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कला दाखवून दिली पाहिजे, असे मार्गदर्शन ठाकरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. दरम्यान, कार्टूनिस्ट कंबाइनचे संजय मिस्त्री यांना मनसेत सामील होण्याचे आमंत्रण राज यांनी दिले. पाल्याने नेमके काय केले पाहिजे, हे पालकांना समजल्यावर घरी मार्गदर्शन करू शकतात. म्हणून कोणत्याही उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सरकार जेव्हा चित्रकला हा विषय बाजूला टाकते तेव्हा झील शैक्षणिक संस्था व्यंगचित्रासाठी उभी राहिली. त्याबद्दल राज यांनी संस्थेचे अभिनंदन केले. व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांनी चित्र काढून कार्यशाळेचे उद्घाटन केले. चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.सहा मिनिटांत भाषण संपवून राज मुंबईला रवाना

संस्थेच्या व्यंगचित्रकार कार्यशाळेत चित्रकलेत रस असणाऱ्या विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी व्यग्र कार्यक्रमातून वेळ काढून राज ठाकरे मुंबईवरून खास पुण्यात आले होते. भावी व्यंगचित्रकारांचा कार्यक्रमाव्यतिरिक्त त्यांचा पुण्यात कोणताही कार्यक्रम नव्हता. जेमतेम सहा मिनिटांचे भाषण संपवून तत्काळ राज ठाकरे मुंबईला रवाना झाले. चित्रकला कार्यशाळेत गेल्यावर पाहुणे कधी निघून जातील अन् आपण कधी चित्र काढू, या सर्व अवस्थेतून गेलो आहे, असे म्हणत फार न बोलता राज ठाकरे मोजके शब्द बोलले.