Home | Maharashtra | Pune | No Permision to Bheem Army milind ekbote and kabir art forum members ban on bhima koregaon

भीम आर्मीच्या सभेला परवानगी नाकारली.. भिडे, एकबोटेंसह 58 जणांना कोरेगाव भीमा, वढूमध्ये बंदी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 29, 2018, 11:31 AM IST

अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेव बंद ठेवण्यात येणार आहे.

  • No Permision to Bheem Army milind ekbote and kabir art forum members ban on bhima koregaon

    पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची 31 डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यासाठी भीम आर्मीतर्फे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. मुंबईत रावणची सभा होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

    भिडे, एकबोटेंसह 58 जणांना कोरेगाव भीमा, वढूमध्ये बंदी

    पुणे ग्रामीण पोलिसांनी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवप्रतिष्ठानचे संभाजी ऊर्फ मनोहर भिडे, समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे, कबीर कला मंच कार्यकर्त्यांसह एकूण 58 जणांना 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा, वढू, पेरणेफाटा व सणसवाडी परिसरात येण्यास प्रवेशबंदी केली आहे. गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.

    पोलिसांनी सीआरपीसी कलम 144 नुसार विविध संघटनांशी संबंधित असलेल्या 58 जणांना नोटिसा बजावल्या असून सीआरपीसी 177 नुसार 188 जणांना दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आले असून सरार्इत 29 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी नेमक्या कोणाकोणाला नोटिसा जारी केल्या आहेत याबाबत खुलासा करण्यास नकार दिला असून जुन्या रेकॉर्डवरील अनेकांची नावे यादीत समाविष्ट असल्याचे सांगितले आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी संबंधित भागात इंटरनेट सेव बंद ठेवण्यात येणार आहे. मुंबर्इ उच्च न्यायालयाने कोरेगाव भीमा येथील जयस्तंभ परिसरातील जमीन दोन दिवसांसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी कोरेगाव भीमा येथील जय स्तंभास भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.

Trending