आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्‍सव मिरवणुकीत डीजे वाजवण्‍याबाबत हायकोर्टाचा दिलासा नाहीच, निकाल ठेवला राखून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ध्‍वनी प्रदुषणाच्‍या कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी डॉल्‍बी, डीजे वाजवण्‍यावर राज्‍य सरकारने बंदी घातली आहे. या बंदीला आव्‍हान देत गणेशोत्‍सव मिरवणुकीत डीजे वाजवण्‍यास परवानगी द्यावी, अशी याचिका मुंबई हायकोर्टात डीजेमालकांनी केली होती. यावर आज (बुधवारी) सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने डीजेमालकांना कोणताही दिलासा न देता याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे.

 

सार्वजनिक ठिकाणी डीजेच्‍या वापराला राज्‍य सरकारने हायकोर्टात जोरदार विरोध केला. ध्वनी प्रदुषणाची पातळी ओलांडणाऱ्या डीजेला सार्वजनिक ठिकाणी परवानगी देणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने न्यायालयात स्पष्ट केले. डीजेची किमान पातळीच ध्वनी प्रदूषणाच्या कमाल मर्यादेच्या बाहेर आहे. त्यामुळे डीजेला परवानगीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राज्य सरकारने म्हटले आहे.
 
गणपती विसर्जनादरम्‍यान पोलीस केवळ कारवाई करू शकतात
गेल्या वर्षभरात ध्वनी प्रदुषणासंदर्भात दाखल झालेल्या गुन्‍ह्यात 75 टक्के प्रकरणे डीजेची असल्याची माहितीही सरकारने न्यायालयात दिली. तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीसारख्या कार्यक्रमात डीजेसंबंधी नियमांचे उल्‍लंघन आढळून आल्‍यास पोलीस केवळ कारवाई करू शकतात, त्यांना रोखू शकत नाही, असेही राज्य सरकार न्यायालयात सांगितले.


डीजे वाजवणारच, उदयनराजे भोसले यांची भूमिका
साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी गणपती विसर्जनाच्‍या कार्यक्रमात डीजे वाजवणारच, अशी भूमिका घेतली आहे. गुन्‍हे दाखल झाले तर ते माझ्यावर दाखल होतील, त्‍यांना हाताळण्‍यास मी समर्थ आहे, असेही त्‍यांनी म्‍हटले होते.

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...