आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील दहा मीटरपेक्षा अधिक उंची असलेल्या तलावांचा अहवालच मिळेना!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रादेशिक जलसंधारण कार्यालयाकडून हतबलता व्यक्त

मंगेश शेवाळकर 

हिंगोली- मराठवाड्यात जलसंधारण विभागाकडून बांधण्यात आलेल्या तलावांपैकी दहा मीटर पेक्षा जास्त उंची असलेल्या तलावांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात तपासणीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही सर्व ८२ तलावांची माहिती मिळालीच नसल्याने प्रादेशिक जलसंधारण कार्यालय हतबल झाले आहे. 

मराठवाड्यात शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंधारण विभागामार्फत सिंचन तलाव बांधण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी पाणी साठवणीसाठी साठवण तलाव बांधले अाहेत. या साठवण तलावांवर अनेक ठिकाणी पाणीपुरवठा योजना देखील आहेत. तर भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ करण्याचे प्रयत्न आहेत. मात्र या, तलावांची उभारणी होऊन तीस वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला गेल्याने या तलावांची नियमितपणे तपासणी होणे गरजेचे आहे. त्यानुसार दहा मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या ८२ तलावांची मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात तपासणी केली जाते. मात्र त्यापैकी केवळ तीस तलावांची मान्सूनपर्व तर वीस तलावांचा मान्सून पश्चात पाहणी करून अहवाल दिला आहे. यामध्ये जिल्ह्यातून दोन, उस्मानाबाद जिल्ह्यातील दोन, जालना जिल्ह्यातील चौदा, बीड जिल्ह्यातील सतरा तलावांची माहितीच देण्यात आली नाही. 


तर नांदेड जिल्ह्यातील २१ तलावांपैकी मान्सूनपूर्व २१ तर मान्सून पश्चात चार, लातूर जिल्ह्यातील २६ तलावांपैकी मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात सोळा तलावांचीच माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आता या सर्वच तलावांची तपासणी करून तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कार्यालय औरंगाबाद यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयास  दिल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नायगव्हाण, आडगाव जावळे येथील तलावांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील नंदापूर, बोलेगाव, शेवगळतांडा, पीरगैबवाडी, तनवाडी, वडीरामसगाव, जामखेड, बनटाकळी, निलाहसिंगवाडी, कर्जत, ठाकूरवाडी, चिंचखेड, कासारवाडी, आर्डातोलाजी साठवण तलावाचा समावेश आहे. 


नांदेड जिल्ह्यातील जाहूर, नांदा, श्रीगणवाडी, नंदनशिवणी, इब्राहिमपूर, कवाना, भोजूचीवाडी, कंधारेवाडी, पळसवाडी, गोगदरी, बाळांतवाडी, पाताळगंगा, फकीरदरावाडी, घोटका, दगडसावंगी, चोंढी, रमण्याचीवाडी, कदमाचीवाडी, येलदरी, रामाचीवाडी, वाघदरवाडी या ठिकाणांच्या साठवण तलावांचा समावेश आहे. 


बीड जिल्ह्यातील गिरवली, दौडवाडी, केकतपांगरी, कुमशी, गंडाळवाडी, सुप्पा, कुसंळम, बांगरवाडी, कारेगाव, बेडूकवाडी, उंखडाचकला, मातकुळी, कारखेल, डोईठाण, कणसेवाडी, बावी, लोणी येथील साठवण तलावांचा समावेश आहे. 

सर्व तलावांची माहिती मिळेना : मराठवाड्यातील ८२ तलावांची मान्सूनपूर्व व मान्सून पश्चात
तपासणी आवश्यक असताना संपूर्ण तलावांची माहितीच मिळत नाही. मराठवाड्यात ३७ तलावांचा मान्सूनपूर्व तर २७ तलावांचाच मान्सून पश्चात अहवाल दिला नाही.  पत्र व्यवहार करूनही माहिती मिळत नसल्याने जलसंधारण कार्यालय हतबल झाले आहे.

१५ मीटर आतील तलावांची माहिती मागवली 

मराठवाड्यातील पंधरा मीटरच्या आतील व पंधरा मीटरपेक्षा अधिक उंचीच्या तलावांची माहिती मागवली जाते. यामध्ये तलावांची स्थिती पाहून त्यानुसार दुरुस्तीबाबत सूचना दिल्या जातात. पंधरा मीटरपेक्षा जास्त उंचीच्या तलावांची माहिती प्राप्त झाली असून सदर माहिती महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक या संस्थेकडे पाठवली आहे. आता पंधरा मीटरच्या आतील तलावांची माहिती सादर करण्याबाबत कळवले आहे. डिसेंबरपर्यंत माहिती मिळणे अपेक्षित आहे, मात्र काही वेळा जानेवारीपर्यंत माहिती दिली जाते. 
-जे. आर. यरमाळकर, स. प्रा. जलसंधारण अधिकारी, औरंगाबाद.

लातूर, उस्मानाबादमधील तलाव

लातूर जिल्ह्यातील खंडाळी, धसवाडी, क्षेत्रफळ, सुकणी, नळगीर, होणी हिप्परगाव, जकनाळ, जानवळ, वाघोली, तीर्थवाडी, रोहिणा, उमरगा रेतू, वंजारवाडी, उमदरदा, हणमंतवाडी, आरी, डोंगरगाव, मरसावंगी, महाळंगी, जानवळ क्रमांक आठ, वडवळ, बोथी, आनंदवाडी, हणमंत जवळगा, मांडुर्की, जढाळा या ठिकाणांच्या तलावांचा समावेश आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील कालवदरा, गावसूद येथील साठवण तलावांचाही यात समावेश आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...