आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपीत भाजपची सत्ता आली तेव्हापासून एकही दंगल घडली नाही; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आली तेव्हापासून राज्यात एकही दंगल घडलेली नाही असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला. त्यांच्या सरकार स्थापनेला मार्च महिन्यात दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त सरकारी कामांचा लेखा-जोखा मांडताना त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून रिपोर्ट कार्ड जारी केला. त्यामध्येच बोलताना, उत्तर प्रदेशाने कायदा आणि सुव्यवस्थेचे देशासाठी आदर्श उदाहरण प्रस्तुत केले आहे असे ते म्हणाले. मार्च 2017 मध्ये आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत होते. उत्तर प्रदेशाचे नाव खून, दरोडा आणि दंगलींमुळे कुप्रसिद्ध होते. परंतु, गेल्या दोन वर्षांत राज्यातील परिस्थिती खूप सुधारली असा दावा योगींनी केला.


आमच्या सरकारमध्ये एकही दंगल झाली नाही -योगी
राज्य सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. त्या पार्श्वभूमीवर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. सरकारच्या कामांचे कौतुक करण्यासाठी झालेल्या या परिषदेत उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र नाथ पांडे यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री योगी म्हणाले, "2012 मध्ये 227 जातीय दंगली घडल्या. 2013 मध्ये 247 दंगली घडल्या होत्या. तर 2014 मध्ये सुद्धा 242, 2015 मध्ये 219 आणि 2016 मध्ये सुमारे 100 दंगलींच्या घटना घडल्या आहेत. यात अनेकांचा जीव गेला आणि कोट्यवधींचे नुकसान झाले." परंतु, भाजपची सत्ता आली तेव्हापासून राज्यात एकही दंगल घडलेली नाही. सोबतच, अपहरण आणि अॅसिड हल्ले सुद्धा थांबले आहेत असे योगींनी ठणकावले. एवढेच नव्हे, तर 2017 मध्ये कैराना येथे कथितरित्या हिंदूंचे पलायन झाले होते. ते सगळेच आता सुखरूप असून घरी परतले आहेत असा दावा योगींना केला आहे.

बातम्या आणखी आहेत...