आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री, सचिवांशी चर्चेनंतरही कर्मचारी संपावर तोडगा नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सात महिन्यांच्या महागाई भत्त्याची भरपाई दिवाळीपर्यंत द्यावी तसेच जानेवारीपासून सर्व भत्त्यांसह सातवा वेतन आयोग मिळावा, या मागण्या मान्य केल्याशिवाय संप मागे घेणार नाही. राज्यात मराठा समाजाने बंदचे आवाहन केले असले तरी अामचाही संप कायम राहील, असा इशारा बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी बुधवारी रात्री पत्रकार परिषदेद्वारे दिला.


दरम्यान, संपाच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा ९० टक्के कर्मचारी गैरहजर होते, असा कर्मचारी संघटनांचा दावा अाहे. तर मंत्रालयात ९० % कर्मचारी व राज्याच्या इतर भागात ५८ टक्के कर्मचारी हजर हाेते, असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.


बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा झाली. त्यांनी शासनाकडे पुरेसे पैसे नसल्याचे सांगितले. मात्र आम्ही तातडीने पैसे मागत नाही. पण, अंमलबजावणीचा निश्चित कार्यक्रम द्यावा, असे आमचे म्हणणे होते. ही चर्चा निष्फळ ठरली, असे दाैंड म्हणाले. संध्याकाळी मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याशीही चर्चा केली. मात्र त्यातही काही ताेडगा निघू शकला नसल्याचे दाैंड म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...