आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Strong Campaining In Manipur For Assembly Polls

ना बॅनरबाजी, ना लाऊडस्पिकर; मणिपुरात प्रचाराचा रंग बेरंग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंफाळः विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 10 दिवस उरले असताना मणिपुरात मात्र प्रचाराची रणधुमाळी थंडावलेलीच असल्‍याचे चित्र आहे. मणिपुरात 28 जानेवारीला मतदान होणार आहे. परंतु, प्रचारात फारसा उत्‍साह दिसत नाही.
देशात 5 राज्‍यांमध्‍ये विधानसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. परंतु, मणिपुरमध्‍ये प्रचाराला रंग चढलेला नाही. उमेदवार केवळ दारोदारी जाऊन संपर्क साधत आहेत. प्रचारासाठी लाऊडस्पिकरचाही वापर होत नाही. तसेच बॅनरबाजीही या ठिकाणी दिसत नाही. अनेक उमेदवार केवळ त्‍यांच्‍या तसेच समर्थकांच्‍या घरावर पक्षाचे झेंडे फडकावुन निवडणुकीचे अस्तित्व जाणवून देत आहेत.
इतके वर्षांनंतर आजही 'सैन्‍य विशेषाधिकार कायदा' हा प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा आहे. या कायद्याला स्‍थानिकांचा तीव्र विरोध आहे. परंतु, या निवडणुकीमध्‍ये याकडे फारसे महत्त्व देण्‍यात आलेले दिसत नाही. यासंदर्भात मतदारांमध्‍येही फारसी चर्चा नाही. परंतु, काही राजकीय पक्षांनी सुशासन आणि सुराज्‍य स्‍थापन करुन राज्‍यात अशा कायद्याची गरज राहणार नाही, अशा वातावरणनिर्मितीचे आश्‍वसन दिले आहे. या निवडणुकीत हा एक मोठा बदल दिसून येत आहे. प्रमुख पक्षांनी वीज, पाणी, घुसखोरी तसेच जीवनावश्‍यक वस्‍तुंचा पुरवठा इत्‍यादी मुद्यांवर भर दिला आहे. प्रचारासाठी जाहीर सभांचेही आयोजन झालेले नाही. सुरक्षेच्‍या कारणात्‍सव रात्रीच्‍या प्रचारावर पूर्णपणे बंदी घालण्‍यात आली आहे. त्‍यामुळेच जाहीर सभा घेण्‍याकडे उमेदवारांचा कल दिसला नाही.