आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयाच्या बंद धमन्या उघडण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत बायपास शस्त्रक्रियेवर केलेल्या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षातून ज्या रुग्णांची बायपास शस्त्रक्रिया झाली आहे किंवा स्टेंट घातला आहे त्यापेक्षा औषधाने अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. मृत्यूच्या संख्येतही अशीच परिस्थिती आहे. ज्यांना त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये खूप अडथळे होते. स्टेंटिंग व बायपास शस्त्रक्रियेनंतर एनजाइनामुळे छातीत दुखत असलेल्या काही रुग्णांना फायदा झाला आहे. शनिवारी अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या एका बैठकीत या संशोधनाला पुष्टी दिली.  बेलर मेडिकल कॉलेज, ह्यूस्टनमधील कार्डिअॅक केअर सेंटरचे संचालक डॉ. ग्लेन लेवाइन म्हणाले, या अभ्यासानंतर हे औषध उपचाराच्या मार्गदर्शकतत्वांमध्ये समाविष्ट करण्यात येईल. बायपासला पर्याय शाेधण्यासाठी इस्किमिया नावाने हा अभ्यास केला या अभ्यासात ५१७९ रुग्णांवर साडेतीन वर्षांपर्यंत लक्ष ठेवण्यात आले. संशोधकांना असे आढळले आहे की, रुग्णांच्या अरुंद रक्तवाहिन्या कोणत्याही ठिकाणी ब्लॉक झाल्या तर संपूर्ण धमनीमध्ये अडथळा निर्माण होतो. यापैकी कोणत्या अडथळ्यामुळे हृदयविकाराचा झटका येईल हे सांगता येत नाही. स्टेंटिंग, सर्जरीने केवळ ब्लॉकेजचा उपचार करता येतो, पण औषधांमुळे पूर्ण सिस्टिम सुधारता येऊ शकते.

स्टेंट न लावता उपचार केले तर ५५५६ कोटींची बचत
संशोधनाचे प्रमुख बोस्टन, एनवाईयू लॉन्गावन हॉस्पिटलचे असोसिएट डीन डॉ. जूडिथ हॉकमन म्हणतात की, अमेरिकेत स्टेंटिंगवर उपचार करण्यासाठी सुमारे १७ लाख रुपये खर्च येतो. शस्त्रक्रियेवर सरासरी खर्च सुमारे ३२ लाख रुपये आहे. छातीत दुखत नसतानाही, ३१०० लोकांना स्टेंट लावले जातात.