आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'No Time To Die' Film's Trailer Has Been Released In 10 Languages, But The Movie Will Be Released In Five Languages

'नो टाइम टू डाय' चित्रपटाचा ट्रेलर 10 भाषांमध्ये रिलीज, मात्र पाच लँग्वेजमध्येच रिलीज होईल चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : जेम्स बॉन्ड सीरीजचा 25 वा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ चा ट्रेलर 10 भाषांमध्ये रिलीज केला गेला आहे. हिंदी, इंग्रजीसोबत बॉन्डचे फॅन्स हा ट्रेलर भोजपुरी, तमिळ, तेलगु, गुजराती, मराठी, पंजाबी, बंगाली, पंजाबी, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये पाहू शकतात. भारतात हा चित्रपट 8 एप्रिलला रिलीज होऊ शकतो. 

चित्रपटाची विशेष बाब ही आहे की, याचा क्लायमॅक्स तीन वेगवेगळ्या पद्धतीने शूट केला गेला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक कॅरी जोजी फुकुनागा यांच्यानुसार, त्यांची इच्छा नव्हती चित्रपटाची कोणतीही माहिती लीक व्हावी.  

चीन मार्केटवर कोरोना व्हायरसचा परिणाम... 

कोरोना व्हायरसचा परिणाम फिल्म इंडस्ट्रीवर देखील एडु लागला आहे. हॉलिवूडच्या चर्चित सीरीजपैकी एक जेम्स बॉन्डचा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ चा बीजिंग प्रीमियर कॅन्सल झाला आहे. इंग्रजी वेबसाइट व्हरायटीनुसार, या व्हायरसमुळे प्रमोशनल टूरदेखील थांबवले गेले आहेत. 

‘नो टाइम टू डाय’ भारत 8 एप्रिलला रिलीज होणार आहे. कोरोना व्हायरस मुळे चीनमध्ये मागच्या महिन्यापासून सिनेमा बंद आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर थियेटर सुरूही झाले तरी चीनी फॅन्स फिल्म स्टार्सला पाहू शकणार नाहीत. कारण यादरम्यान सर्वांना चीनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला गेला आहे.