Home | International | Other Country | No Trousers Tube Ride 2019, Londoners strip off on Subways and Metro

PHOTOS: पॅन्ट न घालताच ऑफिसला निघाले हे अख्खे शहर, दरवर्षी दिसतो असाच नजारा

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 15, 2019, 12:01 AM IST

मेट्रो आणि सबवे स्टेशनवर कडाक्याच्या थंडीत सुद्धा लोकांनी विना पॅन्ट फिरणे पसंत केले.

  • No Trousers Tube Ride 2019, Londoners strip off on Subways and Metro

    इंटरनॅशनल डेस्क - हा नजारा लंडनच्या मेट्रो आणि सबवे स्टेशनवर पाहायला मिळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लंडनच्या नागरिकांनी विशेष दिवस साजरा केला. मग, ऑफिस असो वा कुठे बाहेर जाण्याचा कार्यक्रम कपडे तर सर्वांनी घातले पण पॅन्ट कुणीच घातली नाही. कारण हा दिवस नो पॅन्ट्स डे म्हणूनच पाळला जातो. मेट्रो आणि सबवे स्टेशनवर कडाक्याच्या थंडीत सुद्धा लोकांनी विना पॅन्ट फिरणे पसंत केले. त्यातही बहुतांश लोक विचित्र अंडरवेअरमध्ये दिसून आले. काहींनी आपले आणि आपल्या आसपासचे फोटो सोशल मीडियावर सुद्धा शेअर केले.

    अशी झाली सुरुवात...
    16 वर्षांपूर्वी No Pants Day साजरे करण्याची सुरुवात एक प्रँक (मस्करी) म्हणून न्यूयॉर्क येथे झाली. यात 7 जणांना पॅन्ट न घालता रस्त्यांवर उतरून सर्वांना अचंभित केले. तेव्हापासूनच हा अजब दिन साजरा केल्या जातो. आता या फेस्टिव्हलचा उत्साह जगभरातील 60 शहरांमध्ये दिसून येतो. लोकांना हसवणे हा या मागचा मुख्य हेतू आहे. लंडनच्या वाहतुकीचे प्रमुख साधन सबवेमध्ये लोक अंडरवेअर घालून प्रवास करताना दिसून आले. जवळपास 400 जणांना यात सहभाग घेतला होता. यात लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. या इव्हेंटची माहिती अधिकृतरीत्या फेसबूकवर जारी करण्यात आली होती. यात सहभागी होणाऱ्यांना ग्रुप लीडरचे आदेश मानावे लागतात. कित्येकवेळा ग्रुप लीडर सर्वांना भर रस्त्यावर नेऊन अचानक आपल्या पॅन्ट काढण्याचे आदेश देतो.

    पाळावे लागतात हे नियम
    इव्हेंटमध्ये सहभाग घेणाऱ्यांना काही नियमांचे पालन करावे लागते. यात रेल्वेतील वर्तन नेहमीसारखेच ठेवणे, त्यांना हवे असल्यास दोन अंडरगार्मेंट्स घालू शकतात. पण, त्यामुळे आपल्या जवळपासच्या लोकांना त्रास होता कामा नये.

Trending