आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्तराँमध्ये नव्हती हात धुण्याची सुविधा, १२ लाखांचा झाला दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियात भारतीय रेस्तराँवर स्वच्छता न ठेवल्याबद्दल १२ लाखांचा ( २५ ऑस्ट्रेलियन) दंड ठाेठावण्यात आला आहे. हे रेस्तराँ पर्थच्या साऊथ स्ट्रीटवर आहे. ऑस्ट्रेलियन खाद्य नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. भारतीय रेस्तराँमध्ये हात धुण्याची जागाच नव्हती. 


स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ‘द करी क्लब इंडियन रेस्तराँ’ विराेधात करण्यात आली आहे. याचे मालक निलिश दाेखे आहेत. आराेग्य निरीक्षकांनी रेस्तराँचे निरीक्षण केले हाेते. यात नाल्यात पाणी वाहून जाण्यासाठी काेणतीही व्यवस्था नव्हती.  अनेक ठिकाणी बुरशी आलेली होती. हात धुण्यासाठी साबण व गरम पाणी दिले जात नव्हते. नाल्यात चमचा आढळून आला. परिसरात अनेक ठिकाणी चिखल हाेता. सिंकखालच्या घाण पाइपमधून घाण पाणी थेट किचनमध्ये चालले हाेते. तर रेस्तराँचे मालक निलिस दाेखे यांनी सांगितले, ‘आराेग्य निरीक्षक जेव्हा तपासणीस आला तेव्हा मी तेथे नव्हताे. किचन नेहमी स्वच्छ असते. 

 

बातम्या आणखी आहेत...