आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिथियम आयन बॅटरी बनवणाऱ्या ३ शास्त्रज्ञांना नोबेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम - रसायनशास्त्राच्या या वर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा बुधवारी करण्यात आली. स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये रॉयल स्वीडिश अकॅडमी सायन्सने विजेत्यांच्या नावांची घोषणा केली. अमेरिकेचे जॉन बी. गुडइनफ, इंग्लंडचे के. एम. स्टॅनली विटिंघम आणि जपानचे अकिरा योशिनो यांना संयुक्तरीत्या रसायनशास्त्राचा (केमिस्ट्री) नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. लिथियम आयन बॅटरी विकसित करण्यासाठी या तिघांना हा पुरस्कार देण्यात आला. ९७ वर्षीय गुडइनफ नोबेल मिळवणारे सर्वात ज्येष्ठ वैज्ञानिकही ठरले आहेत. पुरस्काराची सुमारे ६.४९ कोटी रुपयांची रक्कम तिघांमध्ये समान विभागून दिली जाईल. १९७० च्या दशकात तेल संकटादरम्यान ऊर्जेच्या वैकल्पिक स्रोताच्या शोधात या बॅटरीचा शोध लागला होता. 
 

क्रांतिकारी शोध...
१९९१ मध्ये बाजारात आल्यापासून लिथियम बॅटरीने क्रांती घडवली. ते मानवासाठी सर्वात मोठे लाभकारी उपकरण आहे. हलक्या, रिचार्जेबल व शक्तिशाली लिथियम बॅटरीचा उपयोग आता मोबाइल फोनपासून लॅपटॉप व इलेक्ट्रिक वाहनांतही केला जातो. ती सौर वव हवेतून मिळणारी ऊर्जा पुरेशा प्रमाणात साठवूही शकते.  त्यामुळे जीवाश्म इंधनमुक्त समाज शक्य आहे, असे ज्युरींनी म्हटले आहे.