आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोबेल विजेते भारतीय वंशाचे लेखक व्ही. एस. नायपॉल यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- साहित्याच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित भारतीय वंशाचे लेखक आणि कादंबरीकार सर विद्याधर सूरजप्रसाद उर्फ व्ही. एस. नायपॉल (८५) यांचे लंडन येथे शनिवारी निधन झाले. नायपॉल यांचा जन्म १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदादमध्ये एका छोट्या गावात झाला होता. त्यांना ‘सर विद्या’ नावानेही ओळखले जात होते. 


“द मिस्टिक मेसर’ ही त्यांची पहिली कादंबरी १९५१ मध्ये प्रकाशित झाली हाेती. ‘ए बँड इन द रिव्हर’ व “ए हाऊस फॉर मिस्टर बिस्वास’सारख्या रचनांसह त्यांनी ३० हून अधिक पुस्तके लिहिली. १९७१ मध्ये त्यांना बुकर, १९९० मध्ये नाइटहूडड आणि २००१ मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.  

बातम्या आणखी आहेत...