आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अलींना शांततेचे नोबेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओस्लो/अदीस अबाबा : इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली यांना २०१९ या वर्षाचा नोबेल शांतता पुरस्कार दिला जाईल. इरिट्रिया या शेजारी देशाशी सीमेशी संबंधित वादात २० वर्षांपासून सुरू असलेले अडथळे दूर करणे आणि त्यांची सुधारणावादी दूरदृष्टी या बाबी लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.

नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्यासाठी केलेले प्रयत्न आणि शेजारी देश इरिट्रियासोबतचा सीमावाद सोडवण्यासाठी घेतलेल्या पुढाकारासाठी अबी अहमद अली यांना हा पुरस्कार दिला जाईल. इथिओपिया आणि इरिट्रिया यांच्यादरम्यान २२ वर्षे जुने युद्ध संपवण्यात अबी अहमद यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे जुलै २०१८ मध्ये दोन्ही देशांत शांतता करार झाला होता. शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या घोषणेनंतर इथिओपियाच्या पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, 'एक देश म्हणून आम्हाला याचा अभिमान वाटत आहे.' ४३ वर्षीय अबी अहमद यांना इथिओपियाचे नेल्सन मंडेला म्हटले जाते.

एप्रिल २०१८ मध्ये झाले होते इथिओपियाचे पंतप्रधान : दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हटले जाणारे नेल्सन मंडेला जेव्हा तुरुंगातून बाहेर पडले तेव्हा अबी अहमद १३ वर्षांचे होते. ते मंडेलांचे मोठे प्रशंसक आहेत. मंडेलांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट ते नेहमी घालत असत. अबी अहमद एप्रिल २०१८ मध्ये इथिओपियाचे पंतप्रधान झाले. ते आफ्रिकी देशांत सर्वात तरुण शासनप्रमुख ठरले.

पंतप्रधान होताच १०० दिवसांच्या आत हटवली आणीबाणी... 
पंतप्रधान होताच अबी अहमद यांनी इथिओपियात उदारवादी सुधारणा सुरू केल्या. त्यांनी १०० दिवसांच्या आतच आणीबाणी हटवली. माध्यमांवरील सेन्साॅरशिप हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हजारो विरोधी कार्यकर्त्यांची तुरुंगातून सुटका केली. ज्या असंतुष्ट नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देशातून निर्वासित करण्यात आले होते, त्यांना परतण्याची परवानगी दिली.
 

बातम्या आणखी आहेत...