Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | nocturia health problem information in marathi

रात्री झोपेतून उठून कितीवेळा वॉशरूमला जाणे राहते सामान्य

हेल्थ डेस्क | Update - Dec 07, 2018, 03:36 PM IST

रात्री वारंवार बाथरूमला जाण्याच्या समस्येमुळे तुमचा दुसऱ्या दिवसाचा परफॉर्मन्स आणि मूड दोन्ही बिघडू शकतो. 40 वर्ष वयानंत

 • nocturia health problem information in marathi

  बरेच लोक रात्री अनेकवेळा झोपेतून उठून बाथरूमला जातात. ही एक सामान्य गोष्ट आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकराची काही समस्या नाही, परंतु असे रात्रीतून दोनदा ते तीनपेक्षा जास्तवेळा होत असेल तर हा एक प्रकारचा आजार आहे. याला नोक्टूरिया म्हणतात.


  नोक्टूरिया तुमची झोपमोड करू शकतो. यासोबतच या समस्येमुळे तुमचा दिवसातील परफॉर्मन्स आणि मूड दोन्ही बिघडू शकतो. 40 वर्ष वयानंतरच्या लोकांना ही समस्या जास्त आढळून येते.


  काय आहे कारण
  रात्रीच्या वेळी तरल आहार घेतल्याने ही समस्या निर्माण होते. परंतु नोक्टूरिया डायबिटीज आणि हार्टफेलचेही लक्षण असू शकते. डायबिटीजमध्ये सर्व अतिरिक्त शुगर किडनी शोषून घेऊन शकत नाही आणि युरिनमध्ये मिसळली जाते. हार्टफेलमध्ये तुम्हाला बाथरूम जाण्याची इच्छा होते कारण यामुळे रात्री तुमच्या किडनीमध्ये जास्त प्रमाणात तरल पदार्थ पोहोचतात आणि यामुळे बाथरूमला जावे लागते. नोक्टूरिया होण्याचे आणखी एक खास कारण म्हणजे युरीन इन्फेक्शन. या व्यतिरिक्त ब्लॅडर ओव्हर एक्टीव्ह असल्यासही रात्री अनेकवेळा बाथरूमला जावे लागते. ही स्थिती पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त सामान्य आहे.


  काय करावे
  तुम्हाला नोक्टूरियाची समस्या असल्यास रात्री पातळ आहार कमी घ्यावा. यासोबतच रात्री जेवल्यानंतर कॅफिन, अल्कोहोल आणि मसालेदार आहार घेऊ नये. पेल्विक फ्लोर आणि ब्लॅडरला मजबुती देणारा व्यायाम करावा.

Trending