मोटार व्हेईकल अॅक्ट / हेल्मेट न घातल्यामुळे बस चालकाला आकारला दंड, बस मालकाचा न्यायालयात जाण्याचा इशारा

फाईल फोटो फाईल फोटो

चुकी असेल तर दंड भरण्यास तयार, पण कारण योग्य असायला हवे - बस मालक
 

दिव्य मराठी वेब

Sep 21,2019 07:04:00 PM IST

नोएडा - आपल्या नावे 500 रुपये चालान जारी केल्याचा दावा एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने केला आहे. विशेष म्हणजे त्याच्या बस चालकाने कथितरित्या हेल्मेट घातले नसल्यामुळे हे चालान देण्यात आले आहे. व्यावसायिक निरंकार सिंहच्या मते, सदरील ऑनलाइन चालान 11 सप्टेंबर रोजी कापले आहे. शुक्रवारी त्यांच्या एका कर्मचाऱ्याने ही माहिती सांगितले. जर या प्रकरणात आवश्यकता भासल्यास न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाणार असल्याचे व्यावसायिकाने म्हटले आहे.

चुकी असेल तर दंड भरण्यास तयार, पण कारण योग्य असायला हवे - बस मालक
व्यावसायिकाने सांगितले की, माझा व्यवसाय माझा मुलगा सांभाळतो. माझ्याकडे 40-50 बसेस आहेत. या बसेस शाळा तसेच नोएडा आणि ग्रेटर नोएडाच्या खासगी कंपन्यांना भाड्यावर देण्यात आल्या आहेत. ट्रान्सपोर्ट विभागाकडून झालेली ही चूक पाहून मी हैराण झालो आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर आमची चूक असेल तर आम्ही पैसे भरतो पण त्यासाठी योग्य कारण द्यावे. विभागाच्या अशाप्रकारच्या कामावर प्रश्न उपस्थित होतात. याबाबत मी अधिकाऱ्यांकडे जाणार असून वेळ पडल्यास कोर्टात धाव घेईन.


चुकी दुरुस्त केली जाईल - अधिकारी
या प्रकरणाबाबत अधिकारी म्हणाले की, सदरील बाब एका चुकीमुळे झाली आहे. ही चुक सुधारण्यात येईल. दरम्यान हे चालान पोलिसांनी नाही तर नोएडा ट्रान्सपोर्ट विभागाने जारी केले आहे. या अगोदर चालकाने सीट बेल्ट न बांधल्यामुळे या बसवर चार वेळा चालान बनवण्यात आले आहे. सदरील चालान नवीन मोटार व्हीकल अॅक्टअंतर्गत जारी केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रान्सपोर्टर्सनी पुकारला होता संप
गुरुवारी दिल्ली-नोएडात ट्रान्सपोर्टर्सनी संप पुकारला होता. नवीन कायद्यानुसार आकारण्यात येणारा दंड खूप जास्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

X
फाईल फोटोफाईल फोटो
COMMENT