आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानोएडा - नोएडात एका मुस्लिम तरुणाने स्वत:ला हिंदू असल्याचे भासवून लव्ह मॅरेज केले आणि मग तरुणीला जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. एवढेच नाही, तरुणाने बळजबरी अनेकदा आपल्या पत्नीचे अबॉर्शनही केले. जेव्हा तरुणीला कळले की, तिचा पती हिंदू नसून मुस्लिम आहे, तेव्हा तिने विरोध करायला सुरुवात केली. आरोपी तिच्यावर धर्मपरिवर्तनाचा दबाव टाकू लागला. तरुणीला हेही कळले की, आरोपी तरुण आधीपासूनच विवाहित होता, परंतु दुसऱ्या लग्नाची त्याने माहिती दिली नव्हती. तरुणीने पोलिसांत तक्रार करणार असल्याचे म्हणताच आरोपी घरातील दागदागिने घेऊन पळून गेला. पीडितने सेक्टर-39 च्या पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
2010 मध्ये झाली मैत्री, 2016 मध्ये पश्चिम बंगालमध्ये केले लव्ह मॅरेज
नोएडा सेक्टर-45 मध्ये राहणाऱ्या तरुणीची शेजारी राहणाऱ्या अनिल सरकार नावाच्या तरुणाशी 2010 मध्ये ओळख झाली होती. काही वर्षानंतर दोघांमध्ये दाट मैत्री झाली आणि मग ते लग्नासाठी तयार झाले. तरुणीने तिच्या विधवा आईला हे सांगितले. मग जून 2016 मध्ये पश्चिम बंगालच्या मालदामधील एका मंदिरात त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघेही नोएडाच्या सदरपूरमध्ये राहू लागले होते. त्यांच्याच सोबत तरुणीची आईसुद्धा राहू लागली. तरुणीचा आरोप आहे की, 3-4 वेळा ती प्रेग्नंट झाली, परंतु प्रत्येक वेळी आरोपीने तिचे अबॉर्शन केले.
लग्नाच्या 2 वर्षांनी कळले की, अनिलचे खरे नाव तन्वीर आहे...
लग्नाच्या 2 वर्षांनंतर तरुणीला कळले की, तिच्या पतीचे खरे नाव तन्वीर आलम आहे. तिने अनेकदा जाब विचारला, परंतु आरोपी तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकू लागला. बिझनेस करण्याचे सांगून पत्नीचे दागिने घेऊन त्याने 1.80 लाख रुपयांचे कर्ज घेतले. तरुणीने विरोध केल्यावर आरोपीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली.
पतीचा कॉल उचलल्यावर कळले की, त्याला दुसरी पत्नी आहे...
तरुणीने सांगितले की, 14 नोव्हेंबर रोजी पतीच्या फोनवर एक कॉल तिने रिसीव्ह केला. तेव्हा आफरीन नावाच्या महिलेशी तिचे बोलणे झाले. आफरीनने स्वत:ला तन्वीरची पत्नी असल्याचे सांगितले. यामुळे कळले की, ती तन्वीरची दुसरी पत्नी आहे. दोघांमध्ये बोलणे झाल्यावर कळले की, तन्वीर दोघींनाही धोका देत होता. लग्नानंतर दोघींच्या दागिन्यावर त्याने हात साफ केला. दोघींमध्ये बोलणे झाल्याचे कळताच आरोपी रातोरात दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला.
आरोपीला केले जेरबंद
प्रकरणाचे गांभीर्य पाहून सेक्टर-39 पोलिसांत सोमवारी रात्री तक्रार दाखल करण्यात आली. मंगळवारी आरोपीला अटकही करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध महिलेचा छळ करणे, फसवणूक करणे आणि घरातून सामान चोरून नेण्याच्या आरोपांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-डॉ. अजयपाल शर्मा, एसएसपी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.