आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात लवकरच लॉन्च होणार नोकिया 2.3 स्मार्टफोन; इतका मिळणार स्टोरेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - मागील आठवड्यात कायरोमध्ये लॉन्च झालेला एचएमडी ग्लोबलचा लेटेस्ट स्मार्टफोन नोकिया 2.3 लवकरच भारतात दाखल होणार आहे. कंपनीने नोकिया मोबाइल इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याचा टीझर जारी केला आहे. यामुळे हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा कॅमेरा आणि एंटरटेन्मेंट फोकस्ड बजट स्मार्टफोन आहे. जागतिक स्तरावर याची किंमत 8,600 रूपये आहे. फोनमध्ये गूगल असिस्टेंटसाठी डेडिकेटेड बटनासोबत डुअल रिअर कॅमेरा आणि मोठा डिस्प्ले मिळणार आहे. एकदा चार्ज केल्यावर दोन दिवसांपर्यंत याची बॅटरी टिकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. रिपोर्ट्सनुसार, डिसेंबरमध्ये हा मोबाइल भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. 

असे आहेत नोकिया 2.3 स्मार्टफोनचे बेसिक स्पेसिफिकेशन

डिस्प्ले साइज

6.2 इंच

डिस्प्ले टाइप

720x1520 पिक्सल रेजोल्यूशनचा एचडी प्लस डिस्प्ले

सिम टाइप

डुअल नॅनो सिम

ओएस

अँड्राईड 9 पाय    

प्रोसेसर

मीडियाटेक हीलियो ए22

रिअर कॅमरा

13 मेगापिक्सल प्राइमरी कॅमरा + 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर

फ्रंट कॅमरा

5 मेगापिक्सल

रॅम

2 जीबी

स्टोरेज

32 जीबी

एक्सपेंडेबल

400 जीबी

बॅटरी

4000 एमएएच

ट्विटरवर जारी केले दोन टीझर व्हिडिओ


कंपनीने ट्विटरवर दोन छोटे टीझर जारी केले आहेत. पहिल्या टीझरमध्ये फोनची बॅटरी लाइफ दाखवण्यात आली आहे तर दुसऱ्या टीझरमध्ये उत्तम कॅमेरा परफॉर्मेंस मिळण्याचा दावा केला आहे.