आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकिया 6.1 स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात; 2018 मध्ये लॉन्चिंगवेळी 17 हजार रुपये होती किंमत, आता फक्त 6,999 रुपयांत मिळणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅझेट डेस्क - नोकियाने आपला लोकप्रिय स्मार्टफोन नोकिया 6.1 च्या किमतीत चांगलीच कपात करण्यात आली आहे. आता नोकिया 6.1 च्या 3 जीबी व्हॅरियंटची किंमत फक्त 6.999 रुपये आणि 4 जीबी रॅम व्हॅरियंटची किंमत 9,999 हजार रुपये करण्यात आली आहे. हा फोन आपल्या नवीन किमतीसह नोकिया इंडिया ऑनलाइन स्टोरवर दिसण्यास सुरु झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीने गूगल अँड्रॉईड वन प्रोग्राम बेस्ड नोकिया 6.1 ला दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च केले होते. तेव्हा याची सुरुवाती किंमत 16,999 रुपये होती. फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले आणि ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर आहे. 

 

किती आहे नवीन किंमत 
नोकिया इंडियाच्या ऑनलाइन स्टोरवर फोनची नवीन किंमत दाखविण्यात येत आहे. याचे 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत 6,999 रुपये तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी व्हेरियंटची किंमत 9,999 रूपये आहे. ऑफिशियल वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून मोबाईल खरेदी करू शकता. 

 

फोनची स्पेसिफिकेशन्स

> डिस्प्ले साइज    : 5.5 इंच
> डिस्प्ले टाइप    : फुल एचडी प्लस (1080*1920 पिक्सल)
> प्रोसेसर    ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 630
> ओएस    : अँड्रॉईड पाय
> रॅम    : 3GB/4GB
> स्टोरेज    : 32GB/64GB
> एक्सपेंडेबल मेमोरी    : 128GB
> रिअर कॅमरा    : 16MP,एलईडी
> फ्रंट कॅमरा    : 8MP
> कनेक्टिविटी    4G VoLTE, वाय-फाय 802.11, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, एफएम रेडिओ, यूएसबी टाइप सी पोर्ट, 3.5 एमएम हेडफोन जॅक
> सिक्योरिटी    : फिंगरप्रिंट सेंसर (बॅक पॅनल)
> बॅटरी    : 3000mAh, 16 तासांचा टॉकटाइन बॅकअप 

बातम्या आणखी आहेत...