स्मार्टफोन / नोकिया 6.2 भारतात लाँच, 2 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ, किंमत 16 हजार रुपये

6.3 इंच डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सिस्टिम

वृत्तसंस्था

Oct 12,2019 10:48:00 AM IST

नवी दिल्ली - नोकिया ६.२ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल झाला आहे. फोनमध्ये प्यूअर डिस्प्लेशिवाय आकर्षक ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, हा कृत्रिम बुद्धीमतत्तेसह येईल. याशिवाय ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज प्रकारच्या फोनची किंमत १५,९९९ रुपये आहे.हा फोन सिरॅमिक ब्लॅक आणि आइस कलर प्रकारात मिळेल.


फोनची विक्री ११ ऑक्टोबरपासून सुरू झाली. यामध्ये दोन दिवसापर्यंत चालू शकणारी बॅटरी मिळेल,असा दावा करण्यात आला आहे. संरक्षणासाठी त्याच्या दोन्ही बाजूस गोरिला ग्लासचा वापर केला आहे.

X
COMMENT