आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्पेशल फीचर्ससह मार्केटमध्ये दाखल झाला नवा स्मार्टफोन, जाणून घ्या Complete Specs

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - नोकिआ ब्रँडचे स्मार्टफोन तयार करणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने भारतात आपला नवा स्मार्टफोन 'नोकिआ 7.1' लॉन्च केला आहे. यात प्योरव्ह्यू डिस्प्ले आणि 2 रिअर कॅमेरे हे या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आहे. कंपनीच्या या लेटेस्ट एंड्रॉएड वन स्मार्टफोन 'नोकिआ 7.1' ची 7 डिसेंबरपासून विक्री केली जाणार आहे. ग्लॉस मिडनाइट ब्लू आणि ग्लॉस स्टील या दोन कलरमध्ये ते उपलब्ध आहे. 

 

असे आहेत फीचर्स...
या फोनमध्ये प्योरडिस्प्ले पॅनल, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप सोबतच कार्ल झाइस ऑप्टिक्स आणि 3060 एमएएचची बॅटरी यांसारखे फिचर्स देण्यात आले आहे. नोकिआ 7.1 मध्ये 5.48 इंच फुल एचडी + प्योरव्यू डिस्प्ले दिला आहे. त्याचा अॅस्पेक्ट रेशो 19.9 आहे. प्योरव्ह्यू डिस्प्ले स्क्रीन तंत्रज्ञान असलेला कंपनीचा हा पहिलाच फोन आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 मोबाईल प्रोसेसर देण्यात आले आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये अॅपेचर एफ/1.8 सोबत 12 मेगापिक्सल प्रायमरी आणि अॅपेचर एफ/2.4 सोबत 5 मेगापिक्सल सेकंडरी सेंसर दिले आहे,  

 

अशा आहेत ऑफर्स

नोकिआ 7.1 ची किंमत 19,999 रूपये आहे. हा नवीन स्मार्टफोन 7 डिसेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फोनची विक्री देशभरात रिटेल स्टोअर्स आणि Nokia.com या संकेतस्थळावर सुरू होणार आहे. ग्लॉस मिडनाइट ब्लू आणि ग्लॉस स्टील कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. लॉन्च ऑफर्स विषयी सांगायचे झाले, तर नोकिआने एअरटेल सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे फोन खरेदी केल्यावर एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी 1 जीबी डेली 4जी डेटा मिळेल. त्यासाठी किमान 199 रूपयांचे रिचार्ज करावा लागणार आहे. तर एअरटेल पोस्टपेड ग्राहकांना 120 जीबी शिल्लक डेटा आणि तीन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन आणि अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप सुद्धा मिळणार आहे. पण ही ऑफर 499 रूपयांपासून सुरू होणाऱ्या प्लान्सवर मिळणार आहे. तसेच ऑफलाइन स्टोअर्समध्ये एचडीएफसी बँक क्रेडीट व डेबिट कार्डने ईएमआईवर फोन घेतल्यास त्यावर तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक मिळू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...