आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेक्सपिअरच्या कथांमधील गर्विष्ठपणा, गुलामगिरी, कर्ज आणि श्रीमंतांमधील संघर्ष हे नाट्य पाहायचे असल्यास फिनलँडमधील नोकिया कंपनीची बोर्डरूम हे उत्तम ठिकाण आहे. 2008 च्या तुलनेत ही कंपनी अगदी लहान स्वरूपात शिल्लक आहे. तत्कालीन नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रिस्तो सिलास्मा सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी 'ट्रान्सफॉर्मिंग नोकिया : द पॉवर ऑफ पॅरानॉइड ऑप्टिमिझम टू लीड थ्रू कॉलोजल चेंज' या पुस्तकात नोकियाचे पतन कसे झाले, याचे वर्णन केले आहे.
सिलास्मा सांगतात, 2007 मध्ये अॅपलने आयफोन लाँच केला तेव्हा महागाईमुळे तो निवडक बाजारपेठांपर्यंतच पोहोचेल, असे नोकियाला वाटले. त्या वेळी जगात वर्चस्व असलेल्या नोकियाने असा विचार करणे स्वाभाविक होते. नोकिया युजर्स मोबाइलवरून म्युझिक डाउनलोड करू शकत होते, फोटो-व्हिडिओ तयार करू शकत होते. नकाशेही पाहू शकत होते. २००८ मध्ये नोकियाच्या विश्वस्त मंडळावर असलेले सिलास्मा सांगतात, कंपनीच्या निर्णयांमध्ये मंडळातील सदस्यांची पोहोच मर्यादित होती.
सॉफ्टवेअरची पार्श्वभूमी असल्याने मला भविष्यातील आव्हानांची चाहूल लागली होती. नोकियाचे डिव्हाइस अॅपलसारखे दिसत होते, पण ऑपरेटिंग सिस्टिम स्पर्धा करण्याजोगी नव्हती. सिम्बियन सिस्टिम युजर्ससाठी कठीण होती. फोनमध्ये एखादे फंक्शन जोडल्यास कन्फर्मेशनसाठी ते पाठवावे लागत असते. नोकियात विविध ऑपरेटिंग सिस्टिमचे डिव्हाइस होते. त्यामुळे अॅप डेव्हलपर्सचे कामही गुंतागुंतीचे व्हायचे. पण अॅपलकडे एकच प्लॅटफॉर्म होता.
त्या काळी मी कंपनीच्या धोरणात बदल करण्यासाठी एक प्रस्ताव ठेवला. बाजारात वेगाने स्थान मिळवणारी अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली स्वीकारावी, असा सल्ला मी दिला. माझ्या प्रस्तावावर त्यांची प्रतिक्रिया ठीक नव्हती. १९९२ ते २००६ पर्यंत ते कंपनीचे सीईओ होते. त्यांच्या अधिकारकक्षेत कुणी दखलअंदाजी करणे कदाचित त्यांना पटले नसावे. एखादा प्रश्न विचारणेही विरोध केल्यासारखे भासत असे. मी अनेकदा प्रयत्न केला. नोकियाचे सीईओ आणि बोर्ड सदस्यांनाही मेमो पाठवला. त्यात मी सर्व बाबी लिहिल्या होत्या. पण कुणीही याकडे लक्ष दिले नाही. नोकियाच्या माजी अध्यक्षांनी सिलास्मा यांचे आरोप फेटाळून लावलेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.