Home | Business | Gadget | nokia-new-model

नोकियाचा एन ९ बाजारात लवकरच येणार

team divya marathi | Update - May 25, 2011, 12:56 PM IST

मोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी नोकिया लवकरच नवीन स्मार्टफोन लौंच करणार आहे.

  • nokia-new-model

    नोकियाचा एन ९ बाजारात लवकरच येणार

    मोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी नोकिया लवकरच नवीन स्मार्टफोन लौंच करणार आहे. एन ८ या मोडेलला मिळालेल्या यशानंतर आता कंपनी एन ९ हा नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये सादर करणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोबाईल मार्केटमध्ये नोकियाचा वाटा कमी झाला आहे. त्यामुळे नोकियाने अलीकडच्या काळात अनेक नवीन मोडेल्स सादर केली आहेत. त्यापैकी एन ८ या मोडेलला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. एन ९ या मोडेलमध्ये १२ मेगापिक्सेल कॅमेरा राहणार आहे. याशिवाय त्यात अद्ययावत असा मिगो इंटरफेस असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एन ९ लवकरच लौंच होणार आहे. परंतु, किंमत आणि इतर गोष्टी अजून अधिकृतरीत्या स्पष्ट नाहीत.

Trending