Home | Business | Gadget | nokia-to-launch-3d-handset

नोकिया आणणार ३ डी मोबाईल हॅण्डसेट

बिझनेस ब्यूरो | Update - May 19, 2011, 06:15 PM IST

नोकिया कंपनी बाजारात ३ डी मोबाईल लॉंच करणार असल्याची माहिती समोर आलीये.

  • nokia-to-launch-3d-handset

    मोबाईल हॅण्डसेटमध्ये भारतात प्रख्यात असलेली नोकिया कंपनी सातत्याने नवंनवे हॅण्डसेट बाजारात आणत असते. लवकरच ही कंपनी बाजारात ३ डी मोबाईल लॉंच करणार असल्याची माहिती समोर आलीये. या हॅण्डसेटच्या निर्मितीवर सध्या काम सुरू आहे. या हॅण्डसेटमध्ये डबल स्क्रीन असेल, अशी माहिती पुढे आली आहे.

    एलजी आणि एचटीसीने याआधीच आपला ३ डी मोबाईल हॅण्डसेट लॉंच केला आहे. दरम्यान नोकियाने आपल्या ३डी हॅण्डसेटच्या लॉंचिंग आणि किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

    गेल्या काही वर्षांपासून नोकिया मोबाईल हॅण्डसेटच्या बाजारात इतर कंपन्यांना मोठी टक्कर देत आहे. त्यामुळे नोकिया सातत्याने नवंनवे हॅण्डसेट बाजारात आणत आहे.

Trending