नवीन पाऊल / भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होणार नोकियाचा पहिला स्मार्ट टीव्ही, फ्लिपकार्टसोबत केली पार्टनरशिप

नोकियाच्या स्मार्ट टीव्हीमध्ये जेबीएल ब्रँड साऊंड प्रोग्राम सिस्टम मिळेल

Nov 07,2019 03:42:00 PM IST

गॅजेट डेस्क - नोकियाचे अधिकार असलेली फिनलँडची कंपनी एचएमडी ग्लोबल आता भारतीय बाजारपेठेत स्मार्ट टीव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासाठी नोकियाने ई-कॉमर्स ब्रँड फ्लिपकार्टसोबत हातमिळवणी केली आहे. दरम्यान नोकिया टीव्ही जागतिक स्तरावर लॉन्च करणार असल्याचे कंपनीने सांगितले. गेल्या महिन्यात मोटोरोला कंपनीने देखील फ्लिपकार्टसोबत मिळून टीव्ही लॉन्च केला होता.

स्मार्ट टीव्हीबाबत कंपनीने सांगितले की, भारतीय ग्राहकांच्या दृष्टीकोनातून स्मार्ट टीव्हीची निर्मिती करण्यात येणार आहे. टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्युशन नोकिया ब्रँडअंतर्गत करण्यात येईल. कंपनीने यासाठी भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांशी निगडीत रणनिती आखली आहे. मात्र कंपनीने अद्याप टीव्हीचे स्पेसिफिकेशन, किंमत आणि लॉन्चिंग डेट विषयी कोणतीही माहिती सांगितली नाही. मीडिया रिपोर्ट्स नुसार यामध्ये जेबीएल कंपनीचे साउंड सिस्टम देण्यात येणार आहे.


या कंपन्या देखील करत आहेत टीव्हीची निर्मिती

भारतासोबत चीन आणि इतर देशांतील अनेक कंपन्या स्मार्टफोनसोबत आता स्मार्ट टीव्हींची निर्मिती करत आहेत. यात सॅमसंग, मायक्रोमॅक्स, इंटेक्स, श्याओमी, मोटोरोला आणि वनप्लस यांचा सहभाग आहे. या सर्व कंपन्यांचे टीव्ही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. यांमध्ये मोटोरोला आणि वनप्लस टीव्हीचे नवीन ब्रँड आहेत. मोटोरोलाने गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये फ्लिपकार्टसोबत पार्टनरशिप करत आपले स्मार्ट टीव्ही लॉन्च केले होते. यामध्ये 32-इंच पासून 65-इंचपर्यंतचे टीव्हीच्या मॉडलचा समावेश आहे. तर या टीव्हीची किंमत 13,999 पासून सुरु होते.

आम्ही नोकियासोबत काम करण्यास उत्सुक - आदर्श मेनन

फ्लिपकार्टचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि खासगी ब्रँड, इलेक्ट्रॉनिक व फर्निचरचे प्रमुख आदर्श मेनन यांनी सांगितले की, "नोकिया या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ब्रँड आहे. अशात आम्ही त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत." मार्कक्यू हा फ्लिपकार्टचा खासगी लेबल ब्रँड आहे. याच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 6,999 पासून सुरू होते.

X