आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नामकाे'ने काढला भुजबळांच्या 'अार्मस्ट्राँग'च्या मालमत्तेचा लिलाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक मर्चंट काे-अाॅप. बँकेने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा मुलगा पंकज अाणि पुतण्या समीर हे संचालक असलेल्या अार्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावे घेतलेल्या सव्वाचार काेटी रुपयांवरील कर्जापाेटी तारण मालमत्तेचा लिलाव जाहीर केला अाहे. ३० नोव्हेंबर राेजी दुपारी १ ते ३ दरम्यान बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात लिलावप्रक्रिया पार पाडली जाणार अाहे. या कर्जापाेटी तारण दिलेल्या मालमत्तेनुसार भुजबळ फार्मवरील कार्यालय असलेल्या भूखंडाचा समावेश असल्याने भुजबळ राजकारणाची सूत्रे जेथून हलवितात त्या कार्यालयावरच टाच येण्याची शक्यता अाहे. 


मेसर्स अार्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक समीर मगन भुजबळ, पंकज छगन भुजबळ, सत्येन अाप्पा केसरकर हे असून जामीनदारांमध्ये नितीन नेमिचंद राका, दिलीप जगन्नाथ खैरे, विशाखा पंकज भुजबळ, शेफाली समीर भुजबळ यांचा समावेश अाहे. नाशिक तालुक्यातील स. न. ७९५/३ (पै) २ यातील क्षेत्र ०८.५ अार आणि याच सर्व्हे क्रमांकातील ३ (मिळकत मालक शेफाली भुजबळ), स.न. ७९५/३ (पै) ४ यातील ०८.५ अार आणि स.न. ७९५/३ (पै) ५ यातील ०८.५ अार (मिळकत मालक विशाखा भुजबळ), स.न. ७९५/३ (पै) ६ यातील ०८.५ अार (मिळकत मालक शेफाली भुजबळ) अशा या पाच बिनशेती मिळकती असून एकूण क्षेत्रफळ ४२५० चाैरस मीटर इतके अाहे. त्यावरील ६००.४७ चाैरस मीटर क्षेत्रफळावर कार्यालय बांधण्यात अाले अाहे. या संपूर्ण मालमत्तेचा प्रतीकात्मक ताबा नामकाेने काही महिन्यांपूर्वीच घेतला हाेता. बुधवारी लिलावाची अधिकृत नाेटीस नामकाेने प्रसिद्ध केली असून, भुजबळ कुटुंबीयांसाठी हा धक्का मानला जात अाहे. 


वाढत्या एनपीएने गाजली हाेती सभा
नामकाेची नुकतीच पार पडलेली वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या वाढत्या एनपीएमुळे चांगलीच गाजली हाेती. अनुत्पादक कर्जे वाटल्याचा अाराेप प्रशासकांवर झाला हाेता. तर प्रशासकांनीही या अाराेपांचा इन्कार केला हाेता. या पार्श्वभूमीवर या मालमत्तेच्या लिलावाची निघालेली नाेटीस सभासदांमध्ये चर्चेत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...