आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, आघाडीच्या उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला चिंचवड मतदारसंघात धक्का बसला आह. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सर्व उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. त्यानंतर आता अर्जांची तपासणी सुरू आहे. पण, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. पक्षाचा अधिकृत एबी फार्म नसल्याने आघाडीचे प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला.राष्ट्रवादीचे उमेदवार प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण शितोळे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीआधीचा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या मतदारसंघातून महायुतीतून भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याविरोधातील मोठा स्पर्धक निवडणुकीआधीच बाद झाल्याने त्यांना सोपे झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...