आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Nomination Of Dutee Chand's Nomination For Arjuna Award And Harbhajan Singh For Khel Ratna Award Rejected

'हरभजन सिंग'चे खेलरत्न तर 'दुती चंद'चे अर्जुन पुरस्कारातून नामांकण रद्द 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - क्रिडा मंत्रालयाने अर्जुन पुरस्कारासाठी दुती चंद आणि खेळ रत्न पुरस्कारासाठी हरभजन सिंग यांचे नामांकन रद्द केले आहे. राज्य सरकारने दोन्ही खेळाडूंची नावाचा प्रस्ताव टाकला होता. निर्धारित तारखेपर्यंत दुती पदक रँकिंगनसार क्रम नव्हता. मंत्रायलयाने अॅथलेटीक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडून पदकांच्या रँकिंगनुसार निवड करण्यास सांगितले होते. या क्रमवारीत दुती पाचव्या स्थानावर होती. यामुळे तिचे नाव रद्द करण्यात आले आहे. तसेच दोन्ही खेळाडूंचे नाव पाठवण्यास राज्य सरकारांनी उशिरा केला होता. 


आपले नामांकन रद्द झाल्यानंतर दुती चंदने मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली. तिने पटनायक यांना वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये प्राप्त केलेले सुवर्ण पदक दाखवले आणि अर्जुन पुरस्कारासाठी आपले नाव पुन्हा पाठवण्याचा आग्रह केला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी माझी फाईल पुन्हा पाठवण्याचे आश्वासन दिले असल्याचे दुती चंदने सांगितले. 


दुतीच्या नावे 100 मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम
दुतीने म्हटले की, 'अर्जुन पुरस्काराच्या अधिकृत घोषणेपर्यंत नामांकन पाठवण्यात येते. लोकसभा, विधानसभा आणि फेनी वादळामुळे नामांकन पाठवण्यास उशिर झाल्याचे मला माहित झाले.' दुतीने नेपोली वर्ल्ड चॅम्पियनशिप गेम्समध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावले होते. तिने फक्त 11.32 सेंकदाच शर्यत पूर्ण करून हे पदक आपल्या नावे केले होते. तिच्या नावे 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम (11.24 सेकंद) देखील आहे.

 

देशासाठी आणकी पदकं जिंकणार
दुतीच्या मते, '2013 पासून माझ्या खेळात सातत्या राहिले आहे. मी जकार्तामध्ये दोन पदके जिंकली होती. यानंतर आता वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पदक जिंकले आहे. भविष्यात देशासाठी आणखी मिळवणार आहे.' दुतीने एशियन ज्युनिअर अॅथलेटीक्स चॅम्पियनशिप 2014 मध्ये दोन सुवर्ण पदकांची कमाई केली होती. एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिच्या नावे चार कांस्य पदके आहेत. गेल्या वर्षी दुतीने एशियन गेम्समध्ये दोन रजत पदकांवर आपले नाव कोरले होते. 


हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 707 विकेट्स घेतल्या आहेत
दुसरीकडे हरभजनने भारतीय क्रिकेट संघासाठी 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2224 धावा करत 417 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांत हरभजनच्या नावे 1237 धावा आणि 269 विकेट्स आहेत. टी-20 मध्ये हरभजनने 21 गडी बाद केले आहेत. हरभजन 2016 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.  

बातम्या आणखी आहेत...