आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात अनुदानासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा अर्धनग्न मोर्चा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अंशत: असलेल्या अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे, अघोषित शाळा, तुकड्या आणि ज्युनियर काॅलेज यांना अनुदानपात्र घोषित करून २० टक्के अनुदान मिळावे अशा विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने सोमवारी बिटको महाविद्यालय ते विभागीय महसुल आयुक्त कार्यालयापर्यंत शिक्षकांनी अर्धनग्न मोर्चा काढला.

अंशतः अनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान मिळावे व अघोषित शाळा, तुकड्या व ज्युनियर कॉलेज यांना अनुदानपात्र घोषित करून २० टक्के अनुदान द्यावे या मागणीसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने बिटको कॉलेज येथून अर्धनग्न होऊन मोर्चा काढण्यात आला.  मुंबई येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा शिक्षकांनी या वेळी निषेध करून उपायुक्तांना निवेदन देण्यात आले. 

नाशिक विभागातील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी ६ आॅगस्टपासून विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत या शिक्षकांनी विविध आंदोलने केली असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांनी सोमवारी आंदाेलन केले.

बातम्या आणखी आहेत...