Home | Editorial | Columns | Nonviolence is best tool for change

अहिंसा हे परिवर्तनाचे प्रभावी साधन; १०६ वर्षांत ६४% हिंसक आंदोलने अपयशी, ५४% अहिंसक पद्धतीची आंदोलने यशस्वी

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Apr 17, 2019, 09:30 AM IST

हिंसा विरुद्ध अहिंसा, जगभरात ३२३ आंदोलनाच्या फलितांवर विशेष अभ्यासाअंती निष्कर्ष

  • Nonviolence is best tool for change

    नवी दिल्ली- परिवर्तनाची ताकद हिंसेपेक्षा अहिंसेत जास्त आहे. मागील १०० वर्षांमध्ये झालेल्या ३२३ आंदोलनांवर झालेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. १९०० ते २००६ दरम्यान झालेल्या हिंसक व अहिंसक आंदोलनांचा यात अभ्यास करण्यात आला. हार्वर्ड कॅनडी स्कूलच्या प्रोफेसर एरिका चेनोवेथ आणि मारिया जे स्टीफन यांनी हे संशोधन केले. चेनोवेथ म्हणतात, २० व्या शतकात केवळ २६ टक्के हिंसक आंदोलने यशस्वी झाली, तर ६४ टक्के अपयशी ठरले, तर अहिंसेच्या मार्गाने केलेली ५४ टक्के आंदोलने यशस्वी झाली. म्हणजेच हिंसक आंदोलनांच्या तुलनेत अहिंसक आंदोलने परिवर्तन आणण्याच्या दृष्टीने जास्त यशस्वी ठरली. अहिंसेच्या मार्गाने झालेल्या आंदोलनांत चारपट जास्त लोक सहभागी होतात. १९४० च्या दशकात हिंसक आंदोलनांचा यशाचा आलेख थोडा वाढला. चेनोवेथ यांच्या मते, एखादे आंदोलन हिंसक वळणावर गेल्यास ते अपयशी ठरण्याची शक्यता ५० टक्के वाढते. आंदोलकांनी शस्त्र उचलल्यावर सरकारलाही हिंसेच्या मार्गाने प्रत्युत्तर देण्याची संधी मिळते. हिंसक आंदोलन यशस्वी झाले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात. आकडेवारीनुसार, अहिंसेच्या मार्गाने विरोध करणाऱ्या देशांमध्ये लोकशाहीसाठी अधिक पोषक वातावरण असते. अशा देशांमध्ये गृहयुद्धाची शक्यता हिंसक आंदोलनाच्या तुलनेत १५ टक्के कमी असते. ग्लोबल पीस इंडेक्सनुसार, २००८ चे जग २०१८ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी शांत आहे. गेल्या १० वर्षांमध्ये दरवर्षी हिंसा वाढत गेली. ८५ देशांमध्ये मागील १० वर्षांमध्ये अशांतता वाढली, तर ७५ देशांमध्ये सुधारणा झाली. युरोप सर्वात शांत मानला जाणारा खंड, पण मागील १० वर्षांमध्ये तेथील ६१ टक्के देशांमध्ये अशांतता वाढली. जगातील सर्वात अशांत देशांमध्ये या वर्षांत अशांततेचा स्तर १२.५ टक्के आणखी वाढला. २५ सर्वात शांत देशांमध्ये सुधारणा झाली, मात्र केवळ ०.९ %. दहशतवाद हे अशांतता वाढण्यामागील सर्वात मोठे कारण आहे.


    ग्लोबल पीस इंडेक्सनुसार २००८ चे जग २०१८ च्या तुलनेत २.३८ टक्के जास्त अशांत आहे.
    सर्वात शांत अशी ख्याती असलेल्या युरोपमधील देशांत मागील १० वर्षांत ६१% अशांतता वाढली.
    जगात सर्वात अशांत अशा २५ देशांत सध्या अशांततेचा दर १२.५ देशांत वाढला आहे.

Trending