• Home
  • News
  • Nora Fatehi Getting Trolled For Her Comment On A Video

Trolled on social / शॉर्ट ड्रेसमध्ये पाहताच आंटीने घातला गोंधळ, नोरा फतेहीने मुद्दा सोडून इंग्लिश भाषेवर केले कमेंट; सोशल मीडियावर होत आहे ट्रोल

सोशल मीडिया युझर्सने नोराला दिला सल्ला

दिव्य मराठी वेब टीम

May 02,2019 12:19:21 PM IST

बॉलीवूड डेस्क - 'दिलबर' सारखे आयटम नंबर केलेली नोरा फतेही सध्या सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. रॅपर रफ्तारने इंस्टाग्रामवर एका महिलेचा व्हिडिओ शेअर केला. यात ती महिला मुलींना शॉर्ट ड्रेसमध्ये पाहिल्यानंतर गोंधळ घालताना दिसत आहे. पण नोरा फतेहीने मुळ मुद्याला बाजूला सारून महिलेच्या इंग्लिशवरच टिप्पणी केली आहे. हीच टिप्पणी सोशल मीडिया युझर्सना आवडली नाही. नोराने 'वाह... तिने तर खरंच इंग्लिशचा बलात्कार केलाय' अशी कमेंट केली होती.


सोशल मीडियावर नोराला मिळाले सल्ले

> सोशल मीडिया युझर्स नोराला तिच्या कमेंट बद्दल सल्ले देत आहेत. एका युझरने लिहिले की,'मॅम इथे इंग्लिशचा विषय नाहीये. ती महिला आपले विचार लोकांसमोर मांडत आहे.' दुसऱ्या एका युझरने लिहिले,'नेमके काय सुरू आहे याबाबत काहींना काहीच घेणं देणं नसते. काही आजारी मानसिकतेचे लोकांचे काम फक्त इतरांची इंग्लिश तपासण्यात जाते.' एका युझरने लिहिले,'किती विचित्र कमेंट केली आहे.' तर आणखी एका युझरने लिहिले की, 'इंग्लिशशी चिंता कोणालाच नाहीये. तुम्ही जर परिस्थितीच्या गांभीर्याबाबत काही म्हणाला असता तर तुमचे स्वागत केले असते.'

View this post on Instagram

This is aunty. Aunty wants women in short dresses to be raped by men. Aunty is the prime example of whats wrong with society. Dont be like aunty. @sunkissedshitzu sister we are with you. Instagram can go f*#k itsef. Tell them to delete all the propaganda, videos of people harming people and animals (unless they are proofs like this video above), all the stupidity done in the name of humour etc etc first. #auntyjiapologise

A post shared by KALAMKAAR RAFTAAR (@raftaarmusic) on Apr 30, 2019 at 11:25am PDT

रफ्तारने दिला महिलेसारखा विचार न करण्याचा सल्ला

> रफ्तारने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या आंटी आहेत. आंटीला असे वाटते की लोकांनी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसणाऱ्या महिलांवर बलात्कार करावा. समाजात मानसिकता कशी आहे या आंटी त्याचेच उत्तम उदाहरण आहेत. तुम्ही या आंटीसारखा विचार करू नका.'

X
COMMENT