आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नोरिल्स्क- जगाच्या अनेक ठिकाणी वेगवेगळ्या वेळी दिवस-रात्र होते. परंतू तुम्हाला माहितीय का, रुसच्या सायबेरियातील नोरिल्स्कमध्ये दोन महिन्यांपर्यंत अंधारच असतो. तसेच ते जगातील सर्वात थंड शहरांपैकी एक आहे. थंडीच्या दिवसांत तिथिल तापमान जवळपास -61 डिग्री सेल्सियसच्या खाली जाते.
नोरिल्स्कमध्ये होते 9 महिने बर्फवृष्टी
नोरिल्स्क येथे वर्षातील 9 महिने मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते. तर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात लोकांना सुर्याचे दर्शनच नाही होते. वारंवार होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे शहरात सुर्योदय होत नसल्याचे तिथिल लोक सांगतात. त्यामुळेच तिथे दोन महिने अंधार असतो. नोरिल्स्क हे शहर मॉस्कोपासून जवळपास 2900 किलोमीटर दूर आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शहरात पोहचण्यासाठी एकही रस्ता नाही. तिथे जायचे असल्यास लोक विमान किंवा बोटीच्या मदतीने तिथे पोहचतात. तरीही तिथे सर्व गोष्टी उपलब्ध आहे. नोरिल्स्कमध्ये प्लॅटिनम, पॅलेडियम आणि निकेल हे धातू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ते रुसमधील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक आहे.
शहराच्या 30 किलोमीटरच्या परिसरात संपुष्टात आल्या सर्व वनस्पती
एका रिपोर्टनुसार, नोरिल्स्कमधील हवेत सल्फर डायऑक्साइटचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिथिल 30 किलोमीटरच्या क्षेत्रात सर्व वनस्पती संपुष्टात आल्या आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.